IND vs NZ Final : संजू सॅमसनचा ‘विराट’ पराक्रम! एकाच सामन्यात मोडले कोहलीचे तब्बल ३ मोठे विक्रम; बनला भारताचा नवा ‘रन मशीन’
IND vs NZ Final : या खेळीदरम्यान संजूने अशा काही विक्रमांना गवसणी घातली आहे, जे आतापर्यंत केवळ विराट कोहलीसारख्या दिग्गजांच्या नावावर होते.

IND vs NZ Final Sanju Samson break Virat Kohli’s records : टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २५५ धावांचा मोठा डोंगर उभारला. ज्यामध्ये संजू सॅमसनने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. त्याने केवळ ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान संजूने अशा काही विक्रमांना गवसणी घातली आहे, जे आतापर्यंत केवळ विराट कोहलीसारख्या दिग्गजांच्या नावावर होते.
संजूची कोहलीच्या ‘स्पेशल क्लब’मध्ये एन्ट्री –
टी-२० विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत उपांत्य (Semi-final) आणि अंतिम (Final) अशा दोन्ही सामन्यांत अर्धशतक झळकावणारा संजू सॅमसन हा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी २००९ मध्ये शाहिद आफ्रिदी आणि २०१४ मध्ये विराट कोहलीने हा पराक्रम केला होता. आता संजूने या दिग्गज खेळाडूंच्या यादीत मानाचे स्थान पटकावले आहे.
कोहलीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ विक्रम मोडला –
Another special knock added to the collection 👏
Sanju Samson lit up the grand finale for #TeamIndia 🇮🇳
Updates ▶️ https://t.co/5LXBod8bl1#T20WorldCup | #Final | #MenInBlue | #INDvNZ | @IamSanjuSamson pic.twitter.com/M3GTfJBxLT
— BCCI (@BCCI) March 8, 2026
संजू सॅमसनने एका विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला आहे. विराटने २०१६ च्या विश्वचषकात ६ सामन्यांत ३१९ धावा केल्या होत्या. संजूने या विश्वचषकात केवळ ५ सामन्यांत ३२१ धावा पूर्ण करत विराटला मागे टाकले आहे. सध्या या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संजू दुसऱ्या क्रमांकावर आहे.
फायनलमधील ऐतिहासिक खेळी –
संजूने या सामन्यात ४६ चेंडूत ८९ धावांची तुफानी खेळी खेळली. टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतासाठी ही सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे. त्याने केवळ धावाच केल्या नाहीत, तर सलग तीन अर्धशतके झळकावणाऱ्या केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या पंक्तीतही स्थान मिळवले आहे.





