IND vs NZ : किवी सलामीवीरांनी रचला इतिहास! गिल-गंभीरच्या राजवटीत २७ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजांची दुर्दशा

IND vs NZ New Zealand Opening Partnership record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजीचे वाभाडे काढले आहेत. वडोदऱ्याच्या कोटांबी स्टेडियमवर भारतीय कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र डेव्हॉन कॉनवे आणि हेन्री निकोल्स यांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेत एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला.
२७ वर्षांनंतर भारतीय भूमीवर असा पराक्रम –
डेव्हॉन कॉनवे आणि हेन्री निकोल्स या जोडीने भारतीय गोलंदाजांना तब्बल २१.४ षटकांपर्यंत यश मिळू दिले नाही. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भक्कम भागीदारी केली. विशेष म्हणजे, न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी तब्बल २७ वर्षांनंतर भारतीय भूमीवर भारताविरुद्ध वनडे सामन्यात शतकी भागीदारी रचली आहे.
One brings two for Harshit Rana and #TeamIndia!
New Zealand lose both their openers.
Updates ▶️ https://t.co/OcIPHEpvjr#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/gSzvDD40XU
— BCCI (@BCCI) January 11, 2026
यापूर्वी १९९९ मध्ये राजकोट येथे नॅथन ॲस्टल आणि क्रेग स्पीयरमन या जोडीने ११५ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजांना मायदेशात न्यूझीलंडची सलामीची जोडी फोडण्यासाठी इतका संघर्ष करावा लागला.
हेही वाचा – Virat Kohli Record : ‘किंग’ कोहलीचा सौरव गांगुलीला धोबीपछाड! मैदानात उतरताच रचला इतिहास
किवी सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना फोडला घाम:
- हेन्री निकोल्स: ६९ चेंडूत ६२ धावा (८ चौकार).
- डेव्हॉन कॉनवे: ६७ चेंडूत ५६ धावा (६ चौकार, १ षटकार).
क्षेत्ररक्षणातही केल्या चुका –
मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव या सर्वच गोलंदाजांनी प्रयत्न केले, मात्र खेळपट्टीकडून त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यातच भारताकडून एक-दोन झेल सुटल्याचा फायदाही न्यूझीलंडला झाला. अखेर हर्षित राणाने निकोल्सला बाद करत ही ऐतिहासिक जोडी फोडली.





