क्रिकेट कॉर्नर : भारताच्या फलंदाजांना झाले तरी काय?

भारत व न्युझीलंड यांच्यातील दूसरा कसोटी सामना पुण्यात झाला. या सामन्यात आपण वॉशिंग्टन सुंदरसारखा हिरा गवसला. मात्र, ज्या पद्धतीची जागतिक फलंदाजी आपण मिरवतो, त्याला मोठे तडे गेले आहेत. या कसोटीत दोन्ही डावात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व ऋषभ पंत हे देखिल अत्यंत बेजबाबदार पद्धतीने खेळून बाद झाले. पहिल्या कसोटीप्रमाणे या कसोटीतही भारतीय फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली.
ऑन द राइज चेंडू असो किंवा खेळपट्टीवर वळणारा चेंडू असे पाटा खेळपट्टीवर आजतागायत रोहित व कोहलीला सावध खेळताना पाहिलेले नाही. उलट असे चेंडु चौकार व षटकार मारताना पाहिले आहे. त्यामुळेच आता ते ज्या पद्धतीने फलंदाजी करत होत ते पाहावत नव्हते. रोहित व कोहलीने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर ते एकदिवसीय व कसोटी सानन्यावरच लक्ष केंद्रित करतील असे सांगितले जात होते. मात्र, न्युझीलंडविरुद्धची त्यांची हाराकीरी पाहिल्यावर त्याने आता किमान कसोटीतूनही निवृत्ती घेतली पाहीजे. नवोदितांकडे भार सोपवणे त्यांच्या कारकीर्दीसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. दुसर्या डावातही कोहली अपयशी ठरला. त्याला नक्की काय झाले आहे देखिल कळत नाही. केवळ कोहलीच नव्हे तर रोहितसह संघातील अन्य सर्व फलंदाज केवळ हजेरीपटालर स्वाक्षरी करायला यावेत व नंतर लगेच परतावेत असे चित्र पहिल्या कसेटीपासून दिसून येत आहे.
कसोटी सामना पाच दिवस चाललाच पाहीजे असा नियम नाही, परंतू एकाच सत्रात सातत्याने बळी जाणे म्हणजेच सध्याच्या फलंदाजांमध्ये कसोटी खेळण्याची इच्छाशक्तीच राहीलेली नाही. त्यांना टी-२० जास्त प्रिय बनले आहे. चार तासांच्या खेळासाठी अमाप पैसा मिळतो, परंतू एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षक वळत नाहीत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. कोहली तर जितका भरवशाचा होता, मात्र त्याने फलंदाजीला तिसऱ्या क्रमांकावर येणे फारसे रुचलेले नाही. त्याने त्याच्या चौथ्या क्रमांकावरच फलंदाजी करणे गरजेचे आहे. याच क्रमांकावलर त्याने खोर्याने धावा केल्या आहेत. १०० किंवा १५० ची सलामी तसेच तिसऱ्या क्रमांवरील फलंदाज सेट झालेला असताना कोहली मैदानावरुन जे काही फटकेबाजी करतो त्याला नेत्रदीपक हा एकच शब्द पुरेसा ठरतो.
मात्र, यंदाच्या मोसमात कोहली हरवलेला दिसला. तो पुर्वीचा कोहलीच वाटला नाही. तिसर्या कसोटीपूर्वी तरी प्रशिक्षक गौतम गंभीर कोहलीशी चर्चा करतील व त्याच्या फलंदाजीच्या क्रमांवरही काहीतरी निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. कोहली मधल्या फळीत असला तर त्यावेळी चौथ्या, पाचव्या, सहाव्या क्रमांवरील फलंदाजांचे दडपण कमी होवून त्यांना त्यांचा नैसर्गिक खेळ करता येइल. संघ व्यवस्थापन तसेच थिंक टॅंक या गोष्टीचा विचार करेल अशी अपेक्षा आहे.





