IND vs ENG : यशस्वी जैस्वालचा शतकी धमाका! सचिनचा विक्रम मोडत गावस्कर-रोहितच्या यादीत झाला सामील

IND vs ENG Yashasvi Jaiswal’s 4th Century against England : इंग्लंड दौऱ्याची सुरुवात शतकाने करणारा भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने शेवटही शतकाने केला आहे. लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात यशस्वीने दुसऱ्या डावात आपल्या नैसर्गिक शैलीत दमदार शतक ठोकले. पहिल्या डावात अवघ्या दोन धावा करून बाद झालेल्या यशस्वीने दुसऱ्या डावात संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि शानदार खेळी केली.
यशस्वी जैस्वालचे ओव्हलवर पहिले कसोटी शतक –
भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने केनिंग्टन ओव्हल मैदानावर आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. या शानदार खेळीत त्याने इंग्लंडविरुद्ध चौथे शतक ठोकले, तर यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक आणि वेस्ट इंडिजविरुद्ध एक शतक नोंदवले आहे. यशस्वीने 129 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 2 षटकारांच्या साहाय्याने हे शतक पूर्ण केले. या शतकासह त्याने भारताचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि सुनील गावस्कर यांच्या खास यादीत बरोबरी साधली आहे.
💯 𝗳𝗼𝗿 𝗬𝗮𝘀𝗵𝗮𝘀𝘃𝗶 𝗝𝗮𝗶𝘀𝘄𝗮𝗹!👏 👏
This is his 6th Test ton and 2nd hundred of the series! 🙌 🙌
Updates ▶️ https://t.co/Tc2xpWMCJ6#TeamIndia | #ENGvIND | @ybj_19 pic.twitter.com/PnCd6tsgtH
— BCCI (@BCCI) August 2, 2025
जैस्वालने इंग्लंडविरुद्ध झळकावले चौथे शतक –
यशस्वी जैस्वालचा इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्ड कमालीचा आहे. त्याने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध 1100 हून अधिक धावा केल्या असून, हे त्याचे या संघाविरुद्ध चौथे कसोटी शतक आहे. या कामगिरीसह तो रोहित शर्मा आणि सुनील गावस्कर यांच्याबरोबर संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्ध भारताकडून सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याचा विक्रम राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. दोघांनीही प्रत्येकी 7 शतके ठोकली आहेत. यशस्वी सध्या या यादीत चौथ्या स्थानी आहे, जिथे त्याच्यापुढे कर्णधार शुबमन गिलसह इतर काही भारतीय खेळाडू आहेत.
सचिनचा मोडला विक्रम –
𝙔𝙖𝙨𝙝𝙖𝙨𝙫𝙞 𝙅𝙖𝙞𝙨𝙬𝙖𝙡 🫶
Hundred in the first innings of the series 👌
Hundred (and going strong) in the last innings of the series 💪
Updates ▶️ https://t.co/Tc2xpWMCJ6#TeamIndia | #ENGvIND | @ybj_19 pic.twitter.com/hJswO7a4Kt
— BCCI (@BCCI) August 2, 2025
यशस्वी जैसेवालच्या शानदार कामगिरीचा अंदाज यावरूनही येतो की, त्याने ओव्हल कसोटी सामन्यादरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला. वयाच्या 23व्या वर्षी यशस्वीने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक फिफ्टी प्लस धावसंख्या (50+ स्कोअर) नोंदवणारा भारतीय खेळाडू बनण्याचा मान मिळवला. यशस्वीची ही 9वी फिफ्टी प्लस खेळी आहे, तर सचिनने वयाच्या 23व्या वर्षी इंग्लंडविरुद्ध 8 फिफ्टी प्लस खेळी केल्या होत्या.यशस्वीच्या या दमदार खेळीने भारतीय संघाला सामन्यात मजबूत स्थितीत आणले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.





