IND vs ENG : ओव्हल कसोटीत भारताच्या लकी चार्मची एन्ट्री! टीम इंडियाचा विजय निश्चित, चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट

IND vs ENG Rohit Sharma arrives at oval test match : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताने दमदार फलंदाजी करत सामन्यावर पकड मजबूत केली. पहिल्या डावात इंग्लंडपेक्षा २३ धावांनी मागे पडलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि नाईट वॉचमन आकाश दीप यांच्या जोरदार फलंदाजीच्या जोरावर स्कोर पुढे नेला. या सामन्याला माजी कर्णधार रोहित शर्माने हजेरी लावली, ज्यामुळे भारतीय चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
रोहित टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये दाखल –
भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने सामान्य चाहत्याप्रमाणे आपले तिकीट दाखवून ओव्हल स्टेडियममध्ये प्रवेश केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तात्काळ व्हायरल झाला आणि भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली. गेल्या काही आठवड्यांपासून रोहित आपल्या कुटुंबासह युरोपमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होता आणि सध्या तो इंग्लंडमध्ये आहे. या मालिकेत प्रथमच त्याने भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियम गाठले.
#WATCH | United Kingdom | Indian Cricketer Rohit Sharma arrives at The Oval in London for #INDvsEND Fifth Test Day 3 match. pic.twitter.com/rM6MXMsazd
— ANI (@ANI) August 2, 2025
रोहित ठरतोय ओव्हलमध्ये भारतासाठी लकी चार्म –
India’s ODI captain Rohit Sharma arrived at the Oval Cricket Ground to watch the match between India and England🥰
The crowd is cheering loudly for Rohit Sharma ♥️#RohitSharma #ENGvINDpic.twitter.com/yXIGXwci2Y
— Hitman45 (@72Sachin_sharma) August 2, 2025
रोहित शर्माच्या स्टेडियममधील उपस्थितीने भारतीय चाहत्यांच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ओव्हल मैदानावर रोहितला भारतीय संघासाठी शुभ मानले जाते. २०२१ मध्ये झालेल्या ओव्हल कसोटी सामन्यात रोहितने दुसऱ्या डावात अविस्मरणीय शतक ठोकले होते, ज्याच्या जोरावर भारताने तो सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. विशेष म्हणजे, तो भारताचा त्या मैदानावरील ५० वर्षांनंतरचा पहिला विजय होता.
तिसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वाल आणि आकाश दीप यांनी आक्रमक फलंदाजी करत भारताचा स्कोर पुढे नेला. दुसऱ्या दिवसअखेर भारताने २ बाद ७५ धावा केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत यशस्वी जैस्वाल आणि आकाश दीप यांच्या शतकी भागीदारीमुळे भारताने १६६ धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या सत्रात आकाश दीपच्या रूपात भारताला तिसरा धक्का बसला. ९४ चेंडूत १२ चौकारांसह ६६ धावा काढल्यानंतर तो बाद झाला. सध्या यशस्वी जैस्वाल (८५) आणि शुभमन गिल (११) क्रीजवर आहेत. दुपारच्या लंच ब्रेकपर्यंच भारताने तीन विकेट गमावून १८९ धावा केल्या आहेत.





