IND vs ENG : यशस्वी जैस्वालने जिंकली मनं! १२ वर्षीय दृष्टिहीन चाहत्याला दिली खास भेट, पाहा VIDEO

IND vs ENG Yashasvi Jaiswal Heartwarming Gesture : एजबॅस्टन कसोटी सामन्यात भारतीय संघ इंग्लंडवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत आहे. सामन्यातील चार दिवसांचा खेळ पार पडला असून, भारताने इंग्लंडला ४०८ धावांचे लक्ष्य देऊन सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. पहिल्या डावात भारताने १८० धावांची आघाडी घेतली होती. यानंतर दुसऱ्या डावात ४८७ धावा करत ६०७ धावांची आघाडी घेतली. अशात बीसीसीआयने यशस्वी जैस्वालचा एक खास व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये जैस्वालने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. काय आहे तो व्हिडीओ? जाणून घेऊया.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज यशस्वी जैयस्वालने इंग्लंडविरुद्ध चांगली फलंदाजी केली. एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ८७ धावा केल्या. दुसऱ्या डावात तो लवकर बाद झाला, पण त्याने या सामन्यादरम्यान असे काही केले की, सर्वत्र त्याच्या कृतीची प्रशंसा होत आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
यशस्वी जैस्वालने १२ वर्षीय चाहत्याची घेतली भेट –
Meet 12-year old Ravi – He is blind but an avid cricket follower 🫡
He had one wish – to meet Yashasvi Jaiswal and his wish came true this morning at Edgbaston 🫶🏼🥹#TeamIndia | #ENGvIND | @ybj_19 pic.twitter.com/ykvZU5aQ0m
— BCCI (@BCCI) July 5, 2025
एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी यशस्वी जैसेवालने आपल १२ वर्षीय चाहता रवि याची भेट घेतली. रवि दृष्टिहीन आहे, परंतु त्याला क्रिकेटची प्रचंड आवड आहे. याच कारणामुळे तो एजबॅस्टन येथे यशस्वीला भेटण्यासाठी आला होता. यावेळी यशस्वीने त्याच्याशी आपुलकीने संवाद साधला. त्याचबरोबर त्याच्या क्रिकेटबद्दलच्या ज्ञानाचे कौतुकही केले. तसेच आपली एक खास बॅट रविला भेट म्हणून दिली.
हेही वाचा – Wimbledon 2025 : नोव्हॉक जोकोविचचा ऐतिहासिक पराक्रम, विम्बल्डनमध्ये १०० सामने जिंकणारा ठरला तिसरा खेळाडू!
तुझ्याशी भेटून मला खूप आनंद झाला – यशस्वी जैस्वाल
यशस्वीने रविला बॅट देताना म्हटले, “माझ्याकडे तुझ्यासाठी एक भेट आहे आणि मी तुला माझी बॅट भेट देऊ इच्छितो. ही नीट सांभाळून ठेव. तुझ्याशी भेटून मला खूप आनंद झाला.” याला उत्तर देताना रवि म्हणाला, “तुझ्याशी भेटून मला खूप छान वाटलं आणि खूप खूप आभार. तू एक अप्रतिम खेळाडू आहेस आणि मी तुझी बॅट घेण्यासाठी खूप उत्सुक आहे.” रवि आणि यशस्वी यांच्या या भेटीचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय झाला आहे. चाहते रवि आणि यशस्वी या दोघांचेही कौतुक करत आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : ‘बॅझबॉल सोडा अन्…’, भारताचा ऐतिहासिक विजय रोखण्यासाठी वॉनने इंग्लंडला सांगितला फॉर्म्युला
इंग्लंडला विजयासाठी ४५५ धावांची गरज
सामन्याच्या पाचव्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात ६ गडी गमावून १५३ धावा केल्या आहेत. विजयासाठी त्यांना अजून ४५५ धावांची गरज आहे. भारताने पहिल्या सत्रात इंग्लंडला तीन धक्के देत विजयाच्या दिशेने मजल मारली आहे. पावसामुळे पाचव्या दिवशी खेळ उशिरा सुरू झाला, परंतु आकाश दीपने सुरुवातीला दोन गडी बाद करत इंग्लंडला धक्का दिला. त्यानंतर बेन स्टोक्स आणि जेमी स्मिथ यांनी सहाव्या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी करत डाव सावरला. ही भागीदारी वॉशिंग्टन सुंदरने स्टोक्सला बाद करत तोडली. स्टोक्स बाद होताच लंच ब्रेकची घोषणा करण्यात आली. सध्या जेमी स्मिथ ३२ धावांवर नाबाद आहे.





