India vs England 3rd Test : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा 14 फेब्रुवारीपासून खेळल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात मैदानात परत येऊ शकतो. दुखापतीमुळे रवींद्र जडेजा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत संघाचा भाग होऊ शकला नव्हता. पण ताज्या अपडेटनुसार, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जडेजाच्या दुखापतीत वेगाने सुधारणा झाली असून तिसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता वाढली आहे. जडेजाशिवाय केएल राहुलचेही पुनरागमन निश्चित मानले जात आहे. 9 फेब्रुवारीला संघ जाहीर होईल तेव्हा राहुलसोबत जडेजाच्या नावाचाही संघात समावेश होईल.
इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात केएल राहुल आणि रवींद्र जडेजा संघाचा भाग होते. इतकेच नाही तर रवींद्र जडेजाने केवळ 87 धावांची इनिंग खेळली नाही तर 5 विकेट घेण्यातही तो यशस्वी ठरला. मात्र, सामन्याच्या चौथ्या दिवशी जडेजाला हॅमस्ट्रिंगच्या समस्येने झगडावे लागले.
IPL 2024 : मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून का काढले? प्रशिक्षक बाउचरने सांगितले कारण…
रवींद्र जडेजा पहिल्या कसोटीनंतर लगेचच बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहोचला. तिथे जाऊन जडेजाने फिटनेसवर काम केले. जडेजाच्या तंदुरुस्तीत(फिटनेस) सुधारणा झाल्यानंतर त्याला तिसऱ्या कसोटीत खेळण्याची परवानगी मिळण्याची शक्यता जास्त आहे.
जडेजाला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार हे निश्चित…
जडेजाच्या दुखापतीनंतर दुसऱ्या कसोटीसाठी वॉशिंग्टन सुंदर आणि सौरव कुमार यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, या दोन्ही खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात आले नाही. जडेजाच्या जागी कुलदीप यादवला संघात स्थान मिळाले. पण रवींद्र जडेजा परत येताच कुलदीप यादवला वगळले जाऊ शकते. मात्र, खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरत असल्याने संघ व्यवस्थापन चार फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेऊ शकते. जडेजा तंदुरुस्त होताच थेट प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवेल हे निश्चित आहे, कारण तो केवळ चेंडूनेच नाही तर बॅटनेही संघासाठी मोलाचे योगदान देतो.