IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरची लॉर्ड्सवर कमाल! इंग्लंडला गुंडाळत खास शतक केले पूर्ण

IND vs ENG Washington Sundar 100 Wickets Complete : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडने १० गडी गमावून ३८७ धावा केल्या होत्या, तर त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघानेही १० गडी गमावून ३८७ धावाच केल्या. यानंतर भारतीय संघासाठी वॉशिंग्टन सुंदरने शानदा गोलंदाजी करत इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांवर रोखला. यासह सुंदरने विकेट्सचे शतकही पूर्ण केले.
वॉशिंग्टन सुंदरच्या १०० विकेट्स पूर्ण –
‘क्रिकेटची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदरला एकही विकेट घेता आली नव्हती. पण, २५ वर्षीय या फिरकी अष्टपैलू खेळाडूच्या मेहनतीला सामन्याच्या चौथ्या दिवशी यश आलं. रविवारी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सुंदरने चार विकेट्स घेतल्या. त्याने दिग्गज फलंदाज जो रूट (४०), कर्णधार बेन स्टोक्स (३३), यष्टिरक्षक जेमी स्मिथ (८) आणि शोएब बशीर (२) यांना बाद केलं. यासह सुंदरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खास शतक पूर्ण केलं. त्याने १०० आंतरराष्ट्रीय विकेट्सचा टप्पा गाठला.
Innings Break!
Outstanding bowling display from #TeamIndia! 👏 👏
4⃣ wickets for Washington Sundar
2⃣ wickets each for Mohammed Siraj & Jasprit Bumrah
1⃣ wicket each for Akash Deep & Nitish Kumar ReddyIndia need 193 runs to win!
Updates ▶️ https://t.co/X4xIDiSmBg… pic.twitter.com/1BRhfPzynv
— BCCI (@BCCI) July 13, 2025
वॉशिंग्टन सुंदरची आतापर्यंतची कामगिरी –
वॉशिंग्टन सुंदरने आतापर्यंत ८८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ११ कसोटी सामन्यांमध्ये २९ विकेट्स, २३ एकदिवसीय सामन्यांमध्ये २४ विकेट्स आणि ५४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४८ विकेट्स घेतल्या आहेत. सुंदरने डिसेंबर २०१७ मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा तो २५ वा भारतीय फिरकीपटू ठरला आहे. भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबलेच्या नावावर आहे, ज्याने ४०१ सामन्यांमध्ये ९५६ विकेट्स घेतल्या. रविचंद्रन अश्विन २८७ सामन्यांमध्ये ७६५ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा – IND vs ENG : टीम इंडियाची चिंता वाढली! ऋषभ पंत पाठोपाठ ‘या’ खेळाडूलाही झाली दुखापत
भारताला ऐतिहासिक विजयाची संधी –
सुंदरच्या शानदार गोलंदाजीमुळे इंग्लंडचा दुसरा डाव ६२.१ षटकांमध्ये १९१ धावांवर आटोपला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर नितीश कुमार रेड्डी आणि आकाश दीप यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाली. भारताला लॉर्ड्स येथे विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. पहिल्या डावात दोन्ही संघांनी समान ३८७ धावा केल्या होत्या. भारताने लॉर्ड्सवर आतापर्यंत फक्त तीन कसोटी सामने जिंकले आहेत, आणि आता त्यांच्याकडे चौथा विजय मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.





