IND vs ENG : टीम इंडियाची चिंता वाढली! ऋषभ पंत पाठोपाठ ‘या’ खेळाडूलाही झाली दुखापत

IND vs ENG Akash Deep Injury Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याला दुखापत झाली, त्यामुळे तो गेल्या दोन दिवसांपासून यष्टीरक्षणासाठी मैदानात उतरलेला नाही. याच दरम्यान भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज आकाश दीपला दुखापत झाली आहे. त्याला नक्की काय झालं आहे? जाणून घेऊया.
आकाश दीपला काय झालं?
लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताला मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज आकाश दीप लंगडत मैदानाबाहेर गेला. यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबाबत चिंता वाढली आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, तो या सामन्यात पुढे खेळू शकेल का? आणि मालिकेतील पुढील सामने तो खेळू शकेल का? भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना सध्या सुरू आहे. चौथ्या दिवशी ही घटना घडली. आकाश दीपने सकाळच्या सत्रात चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याने हॅरी ब्रूकला बादही केले होते.
आकाश दीप लंगडत ड्रेसिंग रूममध्ये परतला –
Akash Deep walks off clutching his left hip, sending worrying signals to Team India. Let’s hope it’s nothing too serious as the team’s bowling strength hangs in the balance. 🙏#AkashDeep #INDvsENG #InjuryScare #TestCricket #TeamIndia #CricketUpdates #BowlingStrength pic.twitter.com/IbR6nuZxR4
— IW247 (@iw247official) July 13, 2025
आकाश दीपला आठ षटके टाकल्यानंतर त्रास जाणवला. त्याने दोन षटके निर्धाव टाकली आणि ३० धावांत एक गडी बाद केला. पण त्यानंतर तो लंगडत ड्रेसिंग रूममध्ये परतला. इंग्लंडचा माजी कर्णधार माईक अॅथर्टनने समालोचन करताना सांगितले, “तो खूप लंगडत चाललाय. हे भारतासाठी चांगलं लक्षण नाही.” आकाश दीपची दुखापत अशा वेळी झाली, जेव्हा कसोटी सामना नाजूक अवस्थेत आहे. इंग्लंडने दुपारच्या जेवणापर्यंत ९८ धावांत ४ गडी गमावले होते.
हेही वाचा – IND vs ENG : शोएब बशीर फलंदाजी करणार की नाही? ECB च्या ताज्या अपडेटने संभ्रम!
आकाश दीपचे तंदुरुस्त असणं महत्त्वाचं –
दोन्ही संघांनी पहिल्या डावात प्रत्येकी ३८७ धावा केल्या आहेत. सामना बरोबरीत आहे. आकाश दीप खेळू शकला नाही, तर भारताच्या वेगवान गोलंदाजीला अडचण येऊ शकते. जसप्रीत बुमराहदेखील लॉर्ड्सनंतर उरलेल्या दोन कसोटींपैकी फक्त एकात खेळण्याची शक्यता आहे. यापूर्वी, मोहम्मद सिराजने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने बेन डकेट आणि ओली पोप यांना लवकर बाद केले. नितीश कुमार रेड्डीनेही दडपण राखले आणि झॅक क्रॉलीला बाद केले.
हेही वाचा – IND vs ENG : नितीश रेड्डीने क्रॉलीला आणलं गुडघ्यावर, भारताचा लॉर्ड्सवर दबदबा!
आकाश दीपने ब्रूकला बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. त्याने ब्रूकला त्या षटकात तीन चौकार लगावल्यानंतर बाद केले.आकाश दीप मैदान सोडल्यानंतर भारताला त्याच्या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी त्वरित पावले उचलावी लागतील. सामना आणि मालिका आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे. त्याची तंदुरुस्ती भारतासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. भारताला पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घ्यायची आहे.





