IND vs ENG : ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचा विजयोत्सव! सिराज-गंभीरच्या सेलिब्रेशनने वेधलं लक्ष, पाहा VIDEO
IND vs ENG Indian team celebration after historic victory : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना अत्यंत रोमांचक पद्धतीने संपला. भारतीय संघाने हा सामना ६ धावांनी जिंकत मालिकेला २-२ अशी बरोबरी साधली. सामन्यात एकवेळ भारत पराभवाच्या उंबरठ्यावर असताना सिराज आणि कृष्णा यांच्या शानदार गोलंदाजीने सामन्याचे चित्र पालटले. इंग्लंडला विजयासाठी फक्त ७ धावांची गरज असताना सिराजने अप्रतिम यॉर्कर टाकत गस अॅटकिंसनला बाद केले आणि भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.
सिराजचे ट्रेडमार्क उत्सव आणि संघाचा जल्लोष –
गस अॅटकिन्सनला बाद करताच सिराजने आपले खास ट्रेडमार्क सेलिब्रेशन केले. भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी त्याला घेरले आणि सर्वांनी एकत्र उत्साहात जल्लोष केला. मैदानावर आणि ड्रेसिंग रूममध्ये भारतीय संघाचा उत्साह पाहण्यासारखा होता. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शानदार… जबरदस्त… झिंदाबाद…
Congratulations, Team Bharat ! 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳#INDvsENG pic.twitter.com/6Ph7YDnroP
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 4, 2025
“Eak taraf Mohammed Hai aur eak taraf krishna, tabahi macha denge” line of the decade by captain Shubman Gill 😂🔥🥵
Troller’s keep crying in the corner 🤣🤣#ENGvIND #ENGvsIND #ShubmanGill
pic.twitter.com/sNuBRJ9Tn8— Dhillon (@Dhillon_77777) August 4, 2025
गौतम गंभीरचा आनंद गगनात मावेना –
GG took bullets of hate these past weeks
Every time India stumbled, the trolls came running for him
Now India just pulled off the most incredible Test winReal fans know what GG is building a fearsome squad of warriors#INDvsENG #GautamGambhir
— Drop_in cricket (@drop_incricket) August 4, 2025
The praise should be louder than an insult!!!@ShubmanGill @GautamGambhir #INDvsENG #INDvsEND #INDvsENGTest #ShubmanGill #gautamgambhir pic.twitter.com/T8Z4ITWFYT
— Maverick (@MaverickGowda) August 4, 2025
हा विजय भारतीय कसोटी इतिहासातील सर्वात रोमांचक विजयांपैकी एक मानला जात आहे. सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघातील सपोर्ट स्टाफ यांनी नाचत-उड्या मारत आनंद साजरा केला. सर्वांनी हात हलवत जल्लोष केला. गौतभ गंभीरने विजयानंतर मैदानात धाव घेत कर्णधार शुबमन गिलची गळाभेट घेतली.
हेही वाचा – IND vs ENG : भारताचा ओव्हलवर ऐतिहासिक विजय; परदेशात प्रथमच पाचव्या कसोटीत केला ‘हा’ खास पराक्रम
भारताने कसोटीत सर्वात कमी धावांनी मिळवलेला विजय –
हा सामना भारतीय कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावांच्या फरकाने मिळालेला विजय ठरला. यापूर्वी भारताने २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३ धावांनी आणि १९७२ मध्ये कोलकातामध्ये इंग्लंडविरुद्ध २८ धावांनी विजय मिळवला होता. मात्र, एक अंकी धावांच्या फरकाने मिळालेला हा भारताचा पहिलाच विजय आहे.
हेही वाचा – IND vs ENG : अखेरच्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी मारली बाजी! इंग्लंडविरुद्धची मालिका २-२ने राखली बरोबरीत
मालिकेचा रोमांचक शेवट –
या विजयासह भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारताने शानदार पुनरागमन करत विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात लॉर्ड्सवर इंग्लंडने २२ धावांनी बाजी मारली. चौथा सामना अनिर्णित राहिला, आणि अखेरच्या सामन्यात भारताने ६ धावांनी विजय मिळवत मालिका बरोबरीत संपवली.





