IND vs ENG : सिराजला दंड, मग गिलला माफी का? स्टुअर्ट ब्रॉडचा आयसीसीवर हल्लाबोल!

IND vs ENG Stuart Broad Slams ICC : इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आयसीसीवर खेळाडूंना आचारसंहिता भंग केल्याबद्दल दंड ठोठावताना एकसमानता न राखल्याचा आरोप केला आहे. त्याने मोहम्मद सिराजवर बेन डकेटविरुद्ध आक्रमकपणे सेलिब्रेशन केल्याबद्दल मॅच फीच्या 15% दंड ठोठावण्यावर प्रश्न उपस्थित केला. ब्रॉडने असा सवालही केला की, लॉर्ड्स कसोटी सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार शुबमन गिलने लाइव्ह टीव्ही प्रसारणात ‘शिवीगाळ’ केली, तरी त्याला का सोडण्यात आले.
दोघांनाही शिक्षा करायला हवी होती – स्टुअर्ट ब्रॉड
स्टुअर्ट ब्रॉडचे म्हणणे आहे की, आयसीसीने एकतर सिराज आणि गिल दोघांनाही शिक्षा करायला हवी होती किंवा कोणालाच शिक्षा करायला नको होती. त्याने म्हटले की, ‘सातत्य खूप महत्त्वाचे आहे’ आणि जर खेळाडूंनी आयसीसी आचारसंहितेचा भंग केला तर सर्वांसाठी समान शिक्षा असायला हवी. लॉर्ड्स कसोटी सामना सध्या रोमांचक वळणावर आहे.
Ye #NayaIndia hain. Unke ground par, unhi ko daraata hai 🥵
Sunday, the script gets wild 🔥
Dekhiye #ENGvIND 3rd Test Day 4, Sony Sports Network ke TV channels par! 📺#SonySportsNetwork #GroundTumharaJeetHamari #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #ExtraaaInnings pic.twitter.com/4dfS8ZN13s
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 12, 2025
लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात खेळ खूपच तणावपूर्ण झाला. शुबमन गिल स्टंप्सकडे धावत गेला तेव्हा इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉलीशी त्याची काहीशी बाचाबाची झाली. क्रॉलीने वेळकाढूपणा केला, जेणेकरून भारताला त्या दिवशी स्टंप्सपूर्वी दुसरं षटक मिळू नये. चौथ्या दिवशीही हा आक्रमकपणा कायम राहिला. मोहम्मद सिराजने बेन डकेटला बाद केल्यानंतर आक्रमकपणे सेलिब्रेशन केले. यावेळी दोघेही एकमेकांच्या इतके जवळ आले की त्यांचे खांदे एकमेकांना धडकले.
हेही वाचा – IND vs ENG : लॉर्ड्सवर गिलने मोडला द्रविडचा 23 वर्षांचा विक्रम, आता कोहलीच्या रेकॉर्डवर नजर
स्टुअर्ट ब्रॉड काय म्हणाला?
Find this ridiculous. Siraj 15% for aggressive celebration. Gill swears live on tv & carries on and what? It’s either both or neither. Players aren’t and shouldn’t be robots but consistency is key https://t.co/5qtpxCmGZs
— Stuart Broad (@StuartBroad8) July 14, 2025
स्टुअर्ट ब्रॉडने एक्सवर आपले मत व्यक्त करताना लिहिले, “ही गोष्ट खूपच हास्यास्पद आहे. सिराजला आक्रमक सेलिब्रेशनसाठी १५% दंड, पण गिल टीव्हीवर शिवीगाळ करतो आणि त्याला काहीच केले जात नाही? एकतर दोघांनाही दंड व्हायला हवा होता किंवा कोणालाच नको होता. खेळाडू रोबोट नाहीत आणि त्यांनी तसे वागूही नये, पण नियमांमध्ये सातत्य असणे महत्त्वाचे आहे.”
हेही वाचा –IND vs ENG : मोहम्मद सिराजवर ICC ची मोठी कारवाई, लॉर्ड्सवर ‘ती’ चूक करणं पडलं महागात!
मॅच फी कपात करण्याबरोबरच, सिराजच्या अनुशासनात्मक रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंटही जोडला गेला. २४ महिन्यांच्या कालावधीत सिराजचा हा दुसरा अपराध होता, त्यामुळे त्यांचे डिमेरिट पॉइंट्स दोन झाले. भारतीय वेगवान गोलंदाजाने आपला अपराध कबूल केला आणि ICC एलिट पॅनेलचे मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी सुचवलेली शिक्षा मान्य केली.





