IND vs ENG : मोहम्मद सिराजवर ICC ची मोठी कारवाई, लॉर्ड्सवर ‘ती’ चूक करणं पडलं महागात!

IND vs ENG Mohammad Siraj Fined by ICC : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. जो रोमांचक वळण घेऊन अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज या सामन्याचा शेवटचा दिवस आहे. तत्पूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला चौथ्या दिवशी केलेली एक चूक चांगलीच महागात पडली आहे. कारण आयसीसीने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. याचं कारण काय होतं? जाणून घेऊया.
सिराजवर का करण्यात आली कारवाई?
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लिश फलंदाज बेन डकेटची विकेट घेतल्यानंतर आक्रमकपणे सेलिब्रेशन केले होते. त्याचबरोबर त्याला धक्काही दिला होता. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मोहम्मद सिराजवर कारवाई केली आहे. सिराजला आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.५ च्या भंग केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे. मोहम्मद सिराजवर मॅच फीच्या १५ टक्के दंड आकारण्यात आला आहे.
You can’t escape the DSP! 🚨
One shot too many & #BenDuckett has to make his way back as #MohammedSiraj provides an early breakthrough!#ENGvIND 👉 3rd TEST, DAY 4 | LIVE NOW on JioHotstar 👉 https://t.co/vo6bbH8PcQ pic.twitter.com/4vO1Elz9eo
— Star Sports (@StarSportsIndia) July 13, 2025
काय आहे आयसीसीचा नियम?
India’s ace pacer has been penalised for breaching the ICC Code of Conduct on Day 4 at Lord’s.#WTC27 | #ENGvINDhttps://t.co/5GLw5Q6HHf
— ICC (@ICC) July 14, 2025
आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान फलंदाज बाद झाल्यावर अपमानजनक भाषा, कृती किंवा हावभाव करून फलंदाजाला चिथावणी देणे, हे या नियमांतर्गत येते. सिराजवर ही कारवाई २४ तासांच्या आत झाली आहे. दंडाबरोबरच सिराजला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. २४ महिन्यांच्या कालावधीत हा सिराजचा दुसरा गुन्हा आहे, त्यामुळे त्याच्या डिमेरिट पॉइंट्सची संख्या आता दोन झाली आहे.
हेही वाचा – Wimbledon 2025 : यानिक सिनर ठरला विम्बल्डनचा नवा किंग! WTC च्या विजेत्या संघापेक्षा मिळाले जास्त बक्षीस
सिराजची मालिकेत आतापर्यंत दमदार कामगिरी –
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद सिराजने अप्रतिम गोलंदाजी केली. लीड्स कसोटी सामन्यात सिराजला फारसे यश मिळाले नाही. पण त्याने एजबेस्टन कसोटीत दमदार पुनरागमन केले. पहिल्या कसोटीत सिराजने दोन इंग्लिश फलंदाजांना बाद केले. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याने कमाल केली. या सामन्यात सिराजने तब्बल सात विकेट्स घेतल्या. याच कारणामुळे भारतीय संघाने एजबॅस्टन कसोटीत विजय मिळवून इतिहास रचला.





