Smriti Mandhana : स्मृती मंधानाने झळकावले विक्रमी शतक! ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिलीच खेळाडू

Smriti Mandhana Record Break Century : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने शतक ठोकत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. भारत आणि इंग्लंड महिला संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात स्मृती मंधानाने ६२ चेंडूंमध्ये ११२ धावांची खेळी केली. यासह ती टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एका डावात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे.
नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर इंग्लंडविरुद्ध स्मृती मंधानाने शतकी खेळी साकारताना १५ चौकार आणि ३ षटकार लगावले. या खेळीमुळे ती टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. यापूर्वी, हरमनप्रीत कौर ही महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकणारी पहिली भारतीय फलंदाज होती. तिने ९ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रोव्हिडन्स येथे भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान ५१ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि ८ षटकारांच्या साहाय्याने १०३ धावांची खेळी केली होती.
Hundred in Tests
Hundred in ODIs
Hundred in T20IsThe only Indian woman to smash hundreds in all formats! 🇮🇳👑
Take a bow, Queen Smriti Mandhana! 🙇♂️
Joining the elite club of Suresh Raina – the trailblazer who did it first. 🫡🔥#SmritiMandhana #TeamIndia #ENGWvINDW #Raina pic.twitter.com/iKc7mkvocO— GyanGainer (@techind34820937) June 28, 2025
महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वोच्च धावसंघ:
- स्मृति मंधाना – ११२ धावा, इंग्लंडविरुद्ध, ट्रेंट ब्रिज (२८ जून २०२५)
- हरमनप्रीत कौर – १०३ धावा, न्यूझीलंडविरुद्ध, प्रॉव्हिडन्स (९ नोव्हेंबर २०१८)
- मिताली राज – ९७* धावा, मलेशियाविरुद्ध, क्वालालंपूर (३ जून २०१८)
- स्मृती मंधाना – ८७ धावा, आयर्लंडविरुद्ध, गेकेबरहा (२० फेब्रुवारी २०२३)
- स्मृती मंधाना – ८६ धावा, न्यूझीलंडविरुद्ध, हॅमिल्टन (१० फेब्रुवारी २०१९)
हेही वाचा – IND vs ENG : ‘…तर प्रसिध कृष्णा अधिक मेडन ओव्हर्स टाकू शकेल’, भारताच्या माजी गोलंदाजाचा दावा
महिलांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिन्ही प्रारूपांमध्ये शतक झळकावणाऱ्या खेळाडूंची यादी :
The first Indian woman cricketer to have international centuries in all three formats of the game 💥
Congratulations @mandhana_smriti #TeamIndia #ENGvIND https://t.co/Rb6dJORk60
— BCCI (@BCCI) June 28, 2025
- हीथर नाइट
- टॅमी ब्यूमॉन्ट
- लॉरा वोल्वार्ड्ट
- बेथ मूनी
- स्मृती मंधाना
हेही वाचा – ZIM vs SA : लुआन ड्रे प्रीटोरियस आफ्रिकेचा नवा सुपरस्टार! पदार्पणातच मोडला ६१ वर्षांचा जुना विक्रम
महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या:
- लूसिया टेलर (अर्जेंटीना) – १६९ धावा, चिलीविरुद्ध, ब्यूनस आयर्स (१३ ऑक्टोबर २०२३)
- दीपिका रसंगिका (बहरीन) – १६१* धावा, सौदी अरेबियाविरुद्ध, अल अमेरात (२२ मार्च २०२२)
- ईशा ओझा (युएई) – १५८* धावा, बहरीनविरुद्ध, अल अमेरात (२६ मार्च २०२२)
- मारिया कॅस्टिनेरास (अर्जेंटीना) – १५५* धावा, चिलीविरुद्ध, ब्यूनस आयर्स (१५ ऑक्टोबर २०२३)
- एलिसा हीली (ऑस्ट्रेलिया) – १४८* धावा, श्रीलंकेविरुद्ध, उत्तरी सिडनी (२ ऑक्टोबर २०१९)





