ZIM vs SA : लुआन ड्रे प्रीटोरियस आफ्रिकेचा नवा सुपरस्टार! पदार्पणातच मोडला ६१ वर्षांचा जुना विक्रम

Lhuan Dre Pretorius Breaks Records in Test Debut : लुआन ड्रे प्रिटोरियसने झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी पदार्पणात आपल्या धडाकेबाज फलंदाजीने कमाल केली. लुआन हा दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे. या विक्रमासह तो दक्षिण आफ्रिकेकडून कसोटीत शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज बनला आहे. लुआनने हा पराक्रम वयाच्या १९ वर्षे आणि ९३ दिवसांत केला. यासह त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज ग्रीम पोलाक याचा विक्रम मोडला.
लुआनने मोडला ६१ वर्षे जुना विक्रम मोडला –
एवढेच नव्हे, तर लुआनने ग्रीम पोलाक यांचा ६१ वर्षे जुना विक्रम मोडला. तो कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा दक्षिण आफ्रिकेचा सातवा फलंदाज ठरला आहे. लुआनने ११२ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले, ज्यात सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. या शतकी खेळीच्या जोरावर त्याने दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीच्या धक्क्यांतून सावरले, जेव्हा संघाने ५५ धावांत चार गडी गमावले होते.
🚨 HISTORY BY LHUAN-DRE PRETORIUS 🚨
– LDP BECOMES THE YOUNGEST SOUTH AFRICAN BATTER TO SCORE A HUNDRED ON TEST DEBUT 🥶 pic.twitter.com/CutQUThNaZ
— Johns. (@CricCrazyJohns) June 28, 2025
लुआनच्या आधी दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकणारे सर्वात कमी वयाचे खेळाडू ग्रीम पोलाक होते. त्यांनी १९६४ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे वयाच्या १९वर्षे आणि ३१७ दिवसांत हा पराक्रम केला होता. या शतकासह ते त्या काळात दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी शतक ठोकणारे सर्वात कमी वयाचे खेळाडू बनले. विशेष बाब म्हणजे ग्रीम पोलाक यांना कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन महान डावखुऱ्या फलंदाजांपैकी एक मानले जाते आणि त्यांची कसोटी सरासरी ६०.९७ राहिली आहे.
हेही वाचा – Dewald Brevis : डेवॉल्ड ब्रेव्हिसचा कसोटी पदार्पणात धमाका! दक्षिण आफ्रिकेसाठी केला मोठा पराक्रम
या यादीत दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज टॉपी ओवेन-स्मिथ यांचेही नाव आहे. त्यांनी १९२९ मध्ये इंग्लंडविरुद्ध २० वर्षे आणि १४५ दिवसांच्या वयात कसोटी शतक ठोकले होते. तसेच, आधुनिक क्रिकेटमधील सुपरस्टार एबी डिव्हिलियर्सने २००४ मध्ये इंग्लंडविरुद्ध २० वर्षे आणि ३३९ दिवसांच्या वयात शतक ठोकून या यादीत स्थान मिळवले होते.
हेही वाचा – IND vs ENG : ‘सचिन सरांच्या व्हिडीओंमुळे टीम इंडियात कमबॅक…’, शफालीची सचिनप्रेरित यशोगाथा, पाहा VIDEO
प्रीटोरियस आणि ब्रेव्हिसने सावरला दक्षिण आफ्रिकेचा डाव –
झिम्बाब्वेविरुद्धच्या या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी अवघ्या ५५ धावांवर आपले पहिले चार गडी गमावले. त्यानंतर लुआन-ड्रे प्रीटोरियस आणि डेवाल्ड ब्रेविस, ज्यांचा हा कसोटी पदार्पणाचा सामना होता, यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी ९५ धावांची भागीदारी साकारली. ब्रेविस आपल्या पदार्पण कसोटी सामन्यात ५१ धावा करून बाद झाला, तर लुआन-ड्रे प्रीटोरियसने १६० चेंडूंमध्ये ११ चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने १६० धावांची खेळी केली.





