IND vs ENG : जो रुटने भारताविरुद्ध रचला इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

भारताविरुद्ध कसोटीत ३००० धावा पूर्ण करणारा पहिलाच खेळाडू –
तिसऱ्या कसोटी सामन्यात ४५ धावा करताच जो रूटने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताविरुद्ध ३००० धावा पूर्ण केल्या. भारताविरुद्ध कसोटीत असा पराक्रम करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध इतक्या धावा कोणत्याही फलंदाजाला करता आल्या नव्हत्या. रूटनंतर दुसऱ्या क्रमांकावर रिकी पॉन्टिंग आहे, ज्याने भारतीय संघाविरुद्ध २५५५ कसोटी धावा केल्या आहेत.
Joe Root becomes the first player to score 3000 Test runs against India.🏏#INDvsENG #ENGvIND #WTC27 #joeRoot #LordsTest #3rdTest #ShubmanGill #BenStokes pic.twitter.com/nNYnv3lbcn
— CutShot (@cutshotcricket) July 10, 2025
भारताविरुद्धच केले होते कसोटी पदार्पण –
जो रूटने २०१२ मध्ये भारताविरुद्धच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने भारताविरुद्ध ३३ कसोटी सामन्यांत एकूण ३००९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या बॅटमधून १० शतके आणि १३ अर्धशतके आली आहेत. भारताविरुद्ध मागील दोन कसोटी सामन्यांत रूटला चांगली कामगिरी करता आली नव्हती, पण आता तो पुन्हा लयीत परतला आहे. रूटकडे अप्रतिम तंत्र आहे आणि एकदा तो खेळपट्टीवर स्थिरावला की, त्याला बाद करणे कठीण होते.
हेही वाचा – IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत भारताला अचानक बदलावा लागला यष्टिरक्षक; ऋषभ पंतने वाढवली चिंता
कसोटी क्रिकेटमध्ये १३००० हून अधिक धावा –
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तो इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत कसोटीत १३१६९ धावा केल्या असून यात ३६ शतके आणि ६७ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, त्याने इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७१२६ धावा आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८९३ धावा केल्या आहेत.





