IND vs ENG : विराट-रोहितचा सल्ला, गिलचं ध्येय: इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणार!

IND vs ENG Shubman Gill expresses excitement and challenges : शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज आहे. २० जूनपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. शुबमन गिल प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे आव्हान मानले जात आहे. कारण संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारखे दिग्गज खेळाडू नाहीत आणि संघात बहुतांश खेळाडू युवा आहेत.
एका खेळाडूला मिळणारा सर्वोच्च सन्मान –
भारतीय संघात अनुभवी खेळाडूंची कमतरता स्पष्टपणे जाणवत आहे. मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी गिलने कर्णधारपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. शुबमन गिल कर्णधारपदाबद्दल म्हणाला की, हा एका खेळाडूला मिळणारा सर्वोच्च सन्मान आहे. देशाचे नेतृत्व करणे प्रत्येकाला शक्य होत नाही, यामुळे मी खूप उत्साहित आहे.
Shubman gill said#shubmangill pic.twitter.com/LVjwLGsXLV
— RVCJ Sports (@RVCJ_Sports) June 19, 2025
याशिवाय, गिलचा विश्वास आहे की इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणे हे आयपीएल जिंकण्यापेक्षा अधिक कठीण आहे. कारण आतापर्यंत भारतासाठी इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणे मोठमोठ्या दिग्गजांनाही जमलेले नाही. विराट कोहली आणि एमएस धोनी यांनाही हे यश मिळालेले नाही. मात्र, राहुल द्रविडने २००७ साली भारताला इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकून दिली होती.
हेही वाचा – IND vs ENG : ‘ही चूक पुन्हा करु नका…’, पहिल्या कसोटीपूर्वी मोहम्मद कैफने टीम इंडियाला दिला महत्त्वाचा सल्ला
कसोटी मालिकेतील विजय महत्त्वाचा –
इंग्लंडमधील कसोटी मालिका जिंकणे आणि आयपीएल विजेतेपद यापैकी कशाला प्राधान्य द्याल, असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “नक्कीच कसोटी मालिकेच्या विजयाला. कर्णधार म्हणून इंग्लंड दौऱ्याची संधी फारशी मिळत नाही. तुम्ही तुमच्या पिढीतील सर्वोत्तम खेळाडूंपैकी असाल, तर कदाचित दोन किंवा तीन दौरे मिळतील. आयपीएल दरवर्षी होते आणि दरवर्षी संधी मिळते. माझ्या मते, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेत मिळवलेला विजय हा अधिक महत्त्वाचा आहे.”
हेही वाचा – Sachin Tendulkar : ‘बाह्य गोंधळ टाळा अन् संघावर…’, पहिल्या कसोटीपूर्वी सचिनने शुबमन गिलला दिला गुरुमंत्र
शुबमन गिलने विराट-रोहितकडून घेतला सल्ला –
शुबमन गिलने आयपीएलदरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याशी चर्चा केली होती. त्याने इंग्लंड दौऱ्यासाठी या दोन्ही खेळाडूंकडून सल्ला घेतला होता. याविषयी बोलताना शुबमन म्हणाला, “मी आयपीएलमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना भेटलो. त्यांनी इंग्लंडमधील त्यांचे अनुभव माझ्याशी शेअर केले. तसेट मी आयपीएलदरम्यान त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचे मार्गदर्शन आणि सल्ले देखील घेतले .”





