IND vs ENG : शुबमन गिलने मोडला मोहम्मद यूसुफचा विक्रम, इंग्लंडमध्ये रचला नवा इतिहास

IND vs ENG Shubman Gill break Mohammad Yousuf record : इंग्लंड दौऱ्यापासून शुबमन गिलला भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद मिळाले आहे, आणि त्यानंतर त्याच्या फलंदाजीत आणखी सुधारणा झाली आहे. सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत तो दमदार कामगिरी करत आहे. मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने शतके ठोकली होती. आता चौथ्या कसोटी सामन्यातही तो संयमित फलंदाजी करत आहे. त्याने अर्धशतक झळकावत मोहम्मद यूसुफचा विक्रम मोडला आहे.
गिलने मोहम्मद यूसुफला टाकले मागे –
इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात अर्धशतक ठोकताच शुबमन गिलने इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा आशियाई फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद यूसुफचा विक्रम मोडला आहे. या कसोटी मालिकेत गिलने आतापर्यंत ६६४ धावा केल्या आहेत, तर यूसुफने २००६ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत ६३१ धावा केल्या होत्या. गिलने आता त्याला मागे टाकले आहे. गिल आता इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत ६५० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला आहे.
𝙎𝙐𝙋𝙀𝙍𝘽 𝙆𝙉𝙊𝘾𝙆 𝙐𝙉𝘿𝙀𝙍 𝙋𝙍𝙀𝙎𝙎𝙐𝙍𝙀! 👏#ShubmanGill came in at 0/2 & scored a counter-attacking fifty! 🙌
A game-changing knock incoming from the skipper? 🤔#ENGvIND 👉 4th TEST, DAY 4 | LIVE NOW on JioHotstar 👉 https://t.co/xkvCs073fI pic.twitter.com/9eC6yIrfku
— Star Sports (@StarSportsIndia) July 26, 2025
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत गिलची कमाल –
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात शुबमन गिलने शतक ठोकत १४७ धावा केल्या. दुसऱ्या कसोटी सामन्यात तर त्याने इंग्लिश गोलंदाजांची धुलाई केली. त्याने पहिल्या डावात २६९ धावा आणि दुसऱ्या डावात १६१ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघ दुसरा कसोटी सामना ३३६ धावांनी जिंकला. तिसऱ्या कसोटीत मात्र तो चांगली कामगिरी करू शकला नाही. आता चौथ्या टेस्ट सामन्यात तो अर्धशतक झळकावून खेळत आहे.
हेही वाचा – IND vs ENG : जसप्रीत बुमराहचा नकोसा विक्रम! कसोटी कारकीर्दीतील नोंदवली सर्वात खराब कामगिरी
आतापर्यंत झळकावलीत आठ शतके –
शुबमन गिलने २०२० मध्ये भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. त्यानंतर आतापर्यंत ३६ कसोटी सामन्यांमध्ये एकूण २५५७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ८ शतके आणि ७ अर्धशतके ठोकली आहेत. विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे आणि भारतीय संघाच्या फलंदाजीच्या मालिकेत महत्त्वाचा दुवा बनला आहे.





