IND vs ENG : संजू सॅमसनचा मोलाचा सल्ला धुडकावला आणि घात झाला! अभिषेक शर्मा पुन्हा एकदा ठरला फ्लॉप
IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा सुरुवातीपासूनच दबावात दिसत होता. मैदानावर असलेल्या संजू सॅमसनने त्याला 'थोडं थांबून खेळ, खेळपट्टीवर वेळ घे' असा मोलाचा सल्ला दिला होता.

IND vs ENG Abhishek Sharma’s struggle continues T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध भारतीय फलंदाजांनी दमदार सुरुवात करुन दिली. या सामन्याक युवा सलामीवीर अभिषेक शर्माकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यातही तो अपयशी ठरला. केवळ ७ चेंडूंत ९ धावा करून तो तंबूत परतला. धक्कादायक बाब म्हणजे, जर अभिषेकने खेळपट्टीवर उपस्थित असलेल्या संजू सॅमसनचा सल्ला मानला असता, तर कदाचित ही वेळ आली नसती.
नेमकं काय घडलं?
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा सुरुवातीपासूनच दबावात दिसत होता. मैदानावर असलेल्या संजू सॅमसनने त्याला ‘थोडं थांबून खेळ, खेळपट्टीवर वेळ घे’ असा मोलाचा सल्ला दिला होता. मात्र, अभिषेकने आक्रमक पवित्रा घेत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि ऑफ स्पिनर विल जॅक्सच्या चेंडूवर फिल सॉल्टकडे झेल देऊन बसला.
विश्वचषकातील कामगिरीचा आलेख चिंताजनक –
Never see such a immature player #INDvsENG #AbhishekSharma pic.twitter.com/cqoKbcaoYH
— YorkerMemes (@desibalak89) March 5, 2026
अभिषेक शर्मासाठी हा विश्वचषक एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला आहे. आतापर्यंत खेळलेल्या ७ डावांपैकी ६ डावांत तो पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्याला सुरुवातीच्या तीन डावात खाते उघडण्यासाठीही मोठा संघर्ष करावा लागला. यानंतर चौथ्या सामन्यात १५ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने एक अर्धशतक झळकावले होते. आता तो सुपर-८ च्या सामन्यानंतर उपांत्य फेरीतही अपयशी ठरला आहे.
ऑफ स्पिनर्ससमोर अभिषेकने पुन्हा टाकली नांगी –
या विश्वचषकात अभिषेक शर्माची सर्वात मोठी कमजोरी ‘ऑफ स्पिन’ गोलंदाजी ठरली आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास त्याचे धाबे दणाणल्याचे स्पष्ट होते:
| निकष | आकडेवारी (टी-२० WC २०२६) |
| सामना केलेले ऑफ स्पिनर्स | ५ डावांत |
| खेळलेले चेंडू | २७ |
| केलेल्या धावा | २९ |
| सरासरी | ९.६६ |
| स्ट्राईक रेट | १०७.४० |
| किती वेळा बाद झाला? | ३ वेळा |
अभिषेक शर्माच्या या खराब कामगिरीनंतर संघ व्यवस्थापन त्याच्या जागी कोणा दुसऱ्या खेळाडूला संधी देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





