IND vs ENG Semifinal : इंग्लंडने टॉस जिंकला अन् भारताचे धाबे दणाणले! बाद फेरीतील ‘हा’ १० वर्षाचा ‘हा’ इतिहास टीम इंडियाला रोखणार?
IND vs ENG Semifinal : इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाने भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

IND vs ENG Semifinal Toss history in knockout : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध कोण भिडणार, याचा फैसला आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील या हाय-व्होल्टेज सामन्यात नाणेफेकीचा (Toss) कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाने भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
टॉस हरला की मॅच गेली? १० वर्षांचा इतिहास काय सांगतो?
भारतीय चाहत्यांच्या चिंतेचे मुख्य कारण गेल्या १० वर्षांतील आकडेवारीमध्ये दडलेले आहे. भारतात खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकाच्या बाद फेरीच्या (Knockout) सामन्यांमध्ये ज्या संघाने टॉस जिंकला, त्यानेच सामनाही खिशात घातल्याचा इतिहास आहे:
🚨 Toss Update 🚨#TeamIndia have been put into bat first.
Updates ▶️ https://t.co/LxSBs3EDPx #T20WorldCup | #MenInBlue | #ENGvIND pic.twitter.com/vPVg80Dik3
— BCCI (@BCCI) March 5, 2026
- २०१६ विश्वचषक: पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून न्यूझीलंडला हरवले होते.
- २०१६ विश्वचषक: दुसऱ्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकून भारताचा पराभव केला होता.
- २०१६ विश्वचषक: फायनलमध्येही वेस्ट इंडिजने टॉस जिंकला आणि इंग्लंडला नमवून जेतेपद पटकावले होते.
- २०२६ विश्वचषक (पहिली सेमीफायनल): नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली आणि दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत फायनल गाठली.
इतिहासाची टांगती तलवार आणि भारताचे आव्हान –
आता याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार की टीम इंडिया हा १० वर्षांचा सिलसिला मोडीत काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय भारतासाठी मोठे आव्हान ठरू शकतो. वानखेडेच्या खेळपट्टीवर नंतर फलंदाजी करणे सोपे जाते की काय, अशी भीती आकडेवारीवरून व्यक्त होत आहे.
विद्यमान चॅम्पियन असलेला भारत आणि त्यापूर्वीचा चॅम्पियन असलेला इंग्लंड यांच्यातील ही लढत अटीतटीची होणार यात शंका नाही. जर टीम इंडियाने हा अडथळा पार केला, तर ते इतिहास बदलून फायनलमध्ये न्यूझीलंडशी भिडतील.





