IND vs ENG : साई सुदर्शनच्या पदार्पणाचा अजब योगायोग; द्रविड, गांगुली, कोहलीच्या पावलावर पाऊल ठेवण्यास सज्ज!

IND vs ENG Sai Sudharsan Test Debut : साई सुदर्शन किती नशीबवान आहेत, हे तुम्ही यावरून समजू शकता की त्याला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळालं आणि पहिल्याच सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पहिल्या सामन्यात जेव्हा कर्णधार शुबमन गिल नाणेफेकीसाठी आला, तेव्हा त्यांनी जाहीर केलं की साई सुदर्शन या सामन्यात पदार्पण करत आहेत. विशेष म्हणजे, साई सुदर्शन ज्या तारखेला कसोटी पदार्पण करत आहेत, त्या तारखेला यापूर्वी ज्यांनी पदार्पण केलं, ते सर्व भारतीय क्रिकेटमधील मोठे स्टार खेळाडू बनलेत.
साई सुदर्शनच्या पदार्पणाची तारीख का आहे खास?
साई सुदर्शनचा कसोटी पदार्पणाचा तारीख २० जून आहे, जो स्वतःच खूप खास आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की, २० जून १९९६ रोजी राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी एकत्र कसोटी पदार्पण केले होते. तो सामना देखील इंग्लंडविरुद्धच खेळला गेला होता. त्यानंतर २०११ मध्ये २० जून रोजीच विराट कोहलीने आपले कसोटी पदार्पण केले होते. विशेष बाब म्हणजे, २० जून रोजी पदार्पण करणारे हे तिन्ही खेळाडू १०० हून अधिक कसोटी सामने खेळण्यात यशस्वी ठरले आहेत. शिवाय, या तिघांनी आपापल्या काळात भारतीय संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे.
साई सुदर्शन कोहली-द्रविडच्या पावलावर पाऊल ठेवणार का?
We are set for the series opener 👌 👌#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/xAbVDUsUdp
— BCCI (@BCCI) June 20, 2025
साई सुदर्शनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास आता शुभारंभाने सुरू झाला आहे. पण प्रश्न असा आहे की, तो सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांच्या यादीत आपले नाव नोंदवू शकेल का? हा प्रश्न उत्सुकता वाढवणारा आहे. ज्या प्रकारे नवीन कर्णधार शुबमन गिल नव्या युगाची सुरुवात करत आहे, त्याचप्रमाणे साई सुदर्शन नवीन स्टार म्हणून उदयास येईल का? हे येणारा काळच ठरवेल.
हेही वाचा – W, 0, W, W, W… ५ चेंडूत ४ विकेट्स घेत मारली बाजी; शेवटच्या षटकात हरलेला सामना जिंकला, पाहा VIDEO
साई सुदर्शनची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी –
साई सुदर्शनने आतापर्यंत २९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १९५७ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३९.९३ अशी आहे. या काळात त्यानी ७ शतके आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत. आता हीच कामगिरी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही करुन दाखवावी लागेल. त्यानंतरच तो गांगुली-द्रविड आणि कोहलीच्या जवळपास पोहोचू शकेल.





