IND vs ENG : रवींद्र जडेजाने चेंडू बदलताच पंचांना चिडवलं; काय होतं कारण? VIDEO होतोय व्हायरल

IND vs ENG Ravindra Jadeja tease Umpire : भारत-इंग्लंड लीड्स कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघाने अनेक वेळा चेंडू बदलण्याची मागणी केली होती. भारतीय संघाची मागणी वारंवार नाकारली जात होती, परंतु अखेरीस जेव्हा चेंडू बदलण्यात आला, तेव्हा रवींद्र जडेजा पंचांकडे मजेशीर इशारे करुन चिडवताना दिसला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, पाचव्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच चेंडूच्या आकारामुळे भारतीय संघ नाराजी व्यक्त करत होता.
जडेजा आणि पंचांचा व्हिडीओ व्हायरल –
भारतीय वेगवान गोलंदाजांना पाचव्या दिवशी गोलंदाजीला स्विंग मिळत नव्हता. शिवाय, खेळपट्टीही शेवटच्या दिवसापर्यंत सपाट झाली होती, त्यामुळे वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून कोणतीही मदत मिळत नव्हती. इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी १०० हून अधिक धावांची भागीदारी केली होती. या दरम्यान, भारतीय संघाने पंचांकडे अनेकदा चेंडू बदलण्याची मागणी केली. वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर चेंडूच्या आकारामुळे अजिबात समाधानी नव्हते. त्यांनी केवळ ३ षटकांत १७ धावा दिल्या होत्या आणि एकही विकेट घेऊ शकला नव्हता.
Finally, India got what they wanted — umpires changed the ball after asking several times! 🇮🇳😅🏏#ENGvIND #RavindraJadeja #Tests pic.twitter.com/iAAKHFNB4G
— Root Jaiswal (@JaiswalRoot) June 24, 2025
जडेजाने पंचांना चिडवले –
ಇವಾಗ ವಿಕೆಟ್ ಬೀಳುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆಯಾ?🧐
📲 ವೀಕ್ಷಿಸಿ | #ENGvIND | 1st Test | Day 5 | LIVE NOW | ನಿಮ್ಮ JioHotstar ನಲ್ಲಿ#TeamIndia #RavindraJadeja pic.twitter.com/QnH03rw9DF
— Star Sports Kannada (@StarSportsKan) June 24, 2025
२८ षटकात अखेरीस भारतीय संघाची मागणी मान्य झाली. जेव्हा पंच क्रिस गफानी यांनी चेंडू बदलण्याचा इशारा केला, तेव्हा रवींद्र जडेजाने पंचांसमोर आपला उत्साह व्यक्त करत त्यांना मजेशीरपणे चिडवलं. जडेजा आपल्या सेलिब्रेशनमधून दर्शवत होता की चेंडू बदलल्यामुळे अखेर त्याचा विजय झाला. जर आपण लीड्स कसोटीतील रवींद्र जडेजाच्या कामगिरीवर नजर टाकली तर पहिल्या आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करताना तो अनुक्रमे ११ आणि २५ धावा करू शकला. गोलंदाजी करताना तो पहिल्या डावात एकही विकेट घेऊ शकला नाही आणि आतापर्यंत दुसऱ्या डावात एकही विकेट घेऊ शकलेला नाही.
हेही वाचा – IND vs ENG : झॅक क्रॉलीच्या ‘त्या’ कृतीने सिराज संतापला! मैदानावर तणावाचे वातावरण, VIDEO व्हायरल
पावसामुळे खेळ थांबला –
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबला, तेव्हा डकेट आणि क्रॉली यांनी पहिल्या विकेटसाठी १८१ धावांची भागीदारी करून इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले आहे. भारतीय संघाला आतापर्यंत कोणतेही यश मिळालेले नाही. इंग्लंडला आता जिंकण्यासाठी आणखी १९० धावा करायच्या आहेत. बेन डकेट शतक आणि झॅक क्रॉली अर्धशतक झळकावून खेळत आहे.





