IND vs ENG : टीम इंडियाला ‘ती’ चूक पडली महागात, रवींद्र जडेजाच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा बसला फटका, पाहा VIDEO

IND vs ENG Jadeja dropped catch shifts momentum : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी हेडिंग्ले येथे भारतीय संघाने पहिल्या डावात ४७१ धावांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळे भारतीय संघ सामन्यात आघाडीवर दिसत होते. मात्र, पावसानंतर जेव्हा इंग्लंड संघ फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा त्यांनी पहिल्याच षटकात झॅक क्रॉलीच्या रुपाने पहिली विकेट गमावली, त्यामुळे भारतीय संघाची सुरुवात जोरदार झाली होती. परंतु, यानंतर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रवींद्र जडेजाने बेन डकेटचा सोपा झेल सोडला आणि सामना इंग्लंडच्या बाजूने झुकला.
रवींद्र जडेजाकडून झाली मोठी चूक –
इंग्लंडने पहिल्या डावात पहिली विकेट लवकर गमावल्यानंतर संघ अडचणीत सापडला होता. कारण जसप्रीत बुमराहच्या षटकात अनेकदा असे प्रसंग निर्माण झाले की विकेट आता पडणारच असे वाटले. ३९ धावांच्या धावसंख्येवर असा एक प्रसंग आला, जेव्हा १५ धावा करणाऱ्या डकेटने पॉइंटला चौकार मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू थेट रवींद्र जडेजाच्या हातात गेला. मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जडेजाने हा सोपा झेल सोडला. ज्यामुळे डकेटला जीवदान मिळाले आणि संघाला भागीदारी रचण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या डावाला पुन्हा गती मिळाली.
#RavindraJadeja dropping catch a rare view 💔💔#INDvsENG @imjadeja pic.twitter.com/zO344dBZ6V
— All is well (@satyarthpr1) June 21, 2025
भारतीय संघाची क्षेत्ररक्षणात निराशाजनक कामगिरी –
Ravindra Jadeja Drops it
🤷😦
Poor with bat already a catch drop #INDvsEND #TestCricket pic.twitter.com/VH3NrLeut0— Puneet (@Puneet201764291) June 21, 2025
या सामन्यात केवळ रवींद्र जडेजाने खराब क्षेत्ररक्षण केले, असे नाही. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि कर्णधार शुबमन गिल यांनीही क्षेत्ररक्षणात चुका केल्या. यामुळे भारतीय गोलंदाजांचा आत्मविश्वासही कमी झाला आहे. चहापानापर्यंत इंग्लंड संघाने १ गडी गमावून १०७ धावा केल्या आहेत. बेन डकेट आणि ऑली पोप हे दोघेही आता स्थिरावले आहेत, ज्यामुळे त्यांना धावा करणे खूप सोपे झाले आहे. भारतीय संघाला सामन्यात पुन्हा आघाडी घ्यायची तर डकेट-पोपची जोडी लवकर फोडावी लागेल.
हेही वाचा – IND vs ENG : कसोटीच्या नियमाचा भंग; शुबमन गिलवर आयसीसीची कारवाई होणार? काय होती चूक? जाणून घ्या
चहापानापर्यंत इंग्लंड भारतापेक्षा ३६४ धावांनी पिछाडीवर –
सध्या डकेट ५३ धावांसह आणि पोप ४८ धावांसह क्रिजवर आहेत. भारताचा पहिला डाव ४७१ धावांवर सर्वबाद झाला आणि जसप्रीत बुमराहने झॅक क्रॉलीला स्वस्तात बाद करून भारताला चांगली सुरुवात करून दिली होती. तथापि, पोप आणि डकेट त्यानंतर क्रिजवर राहिले आणि दुसऱ्या सत्रात भारताला दुसरा कोणताही ब्रेकथ्रू मिळू दिला नाही. इंग्लंडचा संघ सध्या भारतापेक्षा ३६४ धावांनी पिछाडीवर आहे.





