IND vs ENG : कसोटीच्या नियमाचा भंग; शुबमन गिलवर आयसीसीची कारवाई होणार? काय होती चूक? जाणून घ्या

IND vs ENG Shubman Gill risks ICC penalty : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले येथे खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने सर्वबाद ४७१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांनी शतकं झळकावली. त्यामुळे टीम इंडियाला साडेचारशे धावांचा टप्पा पार करता आला. मात्र, यानंतरही कर्णधार शुबमन गिलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
इंग्लंड दौरा हा शुबमन गिलच्या कसोटी नेतृत्त्वाखाली भारतीय संघाचा पहिला दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान गिलने शतक झळकावले आणि त्याचबरोबर अशी एक कृती केली, ज्यामुळे आयसीसी त्याच्यावर कठोर कारवाई करू शकते. आयसीसी शुबमन गिलच्या चुकीमुळे त्यांच्यावर मोठा दंड लावू शकते. आता तुम्ही विचार करत असाल की, गिलने नेमके असे काय केले, ज्यामुळे त्यांच्यावर इतका मोठा दंड लावला जाऊ शकतो? चला तर मग जाणून घेऊया.
आयसीसी गिलवर का करु शकते कारवाई?
How many of you have been fined for wearing black socks before? 😅 pic.twitter.com/CMf1BN8lG0
— Sky Sports Cricket (@SkyCricket) June 20, 2025
शुबमन गिलने हेडिंग्ले कसोटी सामन्यात शतकासह आपल्या कसोटी कर्णधारपदाची सुरुवात केली, परंतु यावेळी त्याने एक चूक केली. जेव्हा तो फलंदाजीसाठी मैदानावर आला, तेव्हा त्याने पांढऱ्या रंगाच्या मोज्यांऐवजी काळ्या रंगाचे मोजे घातले होते, जे कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले. नियमानुसार, कसोटी फॉरमॅटमध्ये पांढऱ्या रंगाचे मोजे पायात घालणे बंधनकारक आहे. हे नियम मॅरिलेबोन क्रिकेट क्लब (MCC) च्या शिफारशीवर आधारित आहेत, जे क्रिकेटचे नियम ठरवते. असे मानले जाते की, या नियमाच्या उल्लंघनामुळे आयसीसी शुबमन गिलवर कठोर कारवाई करू शकते.
हेही वाचा – IND vs ENG : ऑस्ट्रेलियात टीका, इंग्लंडविरुद्ध कमबॅक; पंतने गावस्करांना कौतुक करण्यास पाडले भाग! पाहा VIDEO
काय आहे आयसीसीचा नियम?
आयसीसीच्या नियमांनुसार, कसोटी सामन्यादरम्यान खेळाडूंनी पांढरे, क्रीम किंवा फिकट तपकिरी रंगाचे मोजे परिधान करणे बंधनकारक आहे, असा नियम १९.४५ मध्ये नमूद आहे. हा नियम मे २०२३ पासून लागू करण्यात आला आहे. मात्र, सामन्यादरम्यान शुबमन गिलने काळ्या रंगाचे मोजे परिधान केल्याचे दिसून आले. आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गिलवर दंड आकारला जाऊ शकतो.
हेही वाचा – IND vs ENG : ऋषभने शतकानंतर कोलांटी उडी मारत वेधलं लक्ष, इंग्लिश खेळाडूंसह प्रेक्षकही थक्क, पाहा VIDEO
गिलवर दंड कोण लावू शकते?
हेडिंग्ले येथील सामन्याचे रेफरी रिची रिचर्डसन शुबमन गिलवर दंड लावण्याचा निर्णय घेतील. जर त्यांना शुबमन गिल दोषी आढळला, तर ते कर्णधारावर मॅच फीच्या १० ते २० टक्के दंड लावू शकतात. विशेष म्हणजे गिलव्यतिरिक्त यापूर्वीही अनेक खेळाडूंनी ड्रेस कोडचे उल्लंघन केले आहे. ज्यामध्ये केएल राहुल, इमाम उल हक आणि जो रुटसाख्या खेळाडूंचा समावेश आहे.





