IND vs ENG : ‘आम्ही याला तमाशा म्हणतो…’, वेळकाढूपणावर रवी शास्त्रींनी इंग्लंडच्या खेळाडूंना फटकारलं

IND vs ENG Ravi Shastri on Gill Crawley Fight : भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळात, शेवटच्या षटकात इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांचा सामना भारतीय खेळाडूंशी झाला. शेवटच्या षटकात झॅक क्रॉलीने वेळकाढूपणा केला आणि जाणीवपूर्वक वेळ वाया घालवला. यावरून भारतीय कर्णधार गिलने त्याला डिवचले, ज्यामुळे दोघात वाद झाला. यावर आता भारताचे माजी दिग्गज खेळाडू रवी शास्त्री यांनी इंग्लंडच्या खेळाडूंना चांगलेच सुनावले आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉली वेळ वाया घालवत होता, जेणेकरून खेळ संपेपर्यंत त्यांना कोणताही धक्का बसू नये. यामुळे कर्णधार शुबमन गिल संतापला आणि त्याने थेट जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांच्याशी वाद घातला. रवी शास्त्रीही यावर चांगलेच भडकले. आता त्यांनी या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Always annoying when you can’t get another over in before close 🙄 pic.twitter.com/3Goknoe2n5
— England Cricket (@englandcricket) July 12, 2025
रवी शास्त्री काय म्हणाले?
‘I would have done all that too, a little bit of argy-bargy is okay!’ 🗣️
Ravi Shastri on Day Three’s heated final over at Lord’s 🔥 pic.twitter.com/LqxOK2o9dt
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 13, 2025
रवी शास्त्री म्हणाले, “मी जर भारतीय संघाकडून खेळत असतो, तर मीही असेच काहीतरी केले असते. याला आम्ही खेळातील ‘तमाशा’ म्हणतो. मैदानावर असेच काहीतरी चालते, आणि हेच आपल्याला हवे असते. तुम्ही फक्त ‘गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, घरी जा’ असे म्हणू शकत नाही. थोडा वाद-विवाद ठीक आहे!” जोपर्यंत कोणी मर्यादा ओलांडत नाही, तोपर्यंत मला यात काहीच अडचण वाटत नाही.”
हेही वाचा – IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत हाय व्होल्टेज ड्रामा! क्रॉलीच्या वेळकाढूपणावर संतापला गिल, पाहा VIDEO
टिम साउथीने आपल्या खेळाडूंचा केला बचाव –
इंग्लंडचा गोलंदाजी सल्लागार टिम साउथीने आपल्या खेळाडूंचे समर्थन केले. तो म्हणाला, “मला माहीत नाही त्यांची नेमकी तक्रार काय होती. जेव्हा गिल मध्येच मसाजसाठी थांबला होता, तेव्हा ही गोष्ट खेळाचा एक भाग आहे. शेवटी दोन्ही संघांचा उत्साह पाहणे नेहमीच रोमांचक असते. हा दिवस संपवण्याचा एक थरारक मार्ग होता. दोन्ही संघांची ऊर्जा पाहून आनंद झाला.”





