IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत हाय व्होल्टेज ड्रामा! क्रॉलीच्या वेळकाढूपणावर संतापला गिल, पाहा VIDEO

IND vs ENG Clash Between Gill and Crawley : भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी (१२ जुलै) सामन्याचा शेवट खूपच नाट्यमय झाला. खेळ संपण्यापूर्वी भारतीय कर्णधार शुबमन गिल आणि इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉली यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली. झॅक क्रॉलीने फलंदाजी करताना वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून इंग्लंडला तिसऱ्या दिवशी एका षटकापेक्षा जास्त खेळावे लागू नये. यानंतर गिलसह भारतीय संघ त्याच्यावर चांगलाच संतापला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
भारतीय संघ दोन षटके टाकू इच्छित होता, पण झॅक क्रॉलीने ठरवले होते की ते फक्त एकच षटक खेळतील. इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील पहिले षटक जसप्रीत बुमराहने टाकले, जे तिसऱ्या दिवसाचे शेवटचे षटक ठरले. त्या षटकात झॅक क्रॉली दोनदा स्टम्प्सपासून मागे सरकला, जेणेकरून खेळाला उशीर होईल. यामुळे भारतीय खेळाडू खूपच नाराज झाले. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार शुबमन गिल इंग्लिश फलंदाजाला काहीतरी म्हणाला.
गिलने क्रालीला डिवचल्याचा व्हिडीओ व्हायरल –
Always annoying when you can’t get another over in before close 🙄 pic.twitter.com/3Goknoe2n5
— England Cricket (@englandcricket) July 12, 2025
सर्व गोंधळ तेव्हा आणखी वाढला, जेव्हा जसप्रीत बुमराहच्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर चेंडू झॅक क्राउलीच्या ग्लोव्ह्जवर आदळला. झॅक क्राउलीला वेदना होऊ लागल्या आणि त्यानी फिजिओला बोलावलं, ज्यामुळे आणखी उशीर झाला. यामुळे भारतीय कर्णधार शुबमन गिलचा संताप सातव्या आसमानावर गेला.
हेही वाचा – Wimbledon 2025 : इगा स्वियातेकने पहिल्यांदाच पटकावले विम्बल्डनचे विजेतेपद, अनिसिमोवाला चारली धूळ
गिलने पॅव्हेलियनकडे बोट दाखवत ‘X’ चा इशारा केला –
शुबमन गिलने पॅव्हेलियनकडे बोट दाखवत हातांनी ‘X’ चिन्ह बनवलं. आयपीएल सामन्यांमध्ये जेव्हा एखादी टीम खेळाडूला बदलून इम्पॅक्ट सब आणते, तेव्हा पंच असंच ‘X’ चिन्ह दाखवतात. म्हणजेच शुबमन गिल इंग्लिश ड्रेसिंग रूमला संकेत देत होता की क्राउली आता रिटायर होऊ इच्छितो आणि त्याच्या जागी सबस्टिट्यूट खेळाडू खेळण्यासाठी पाठवा.
हेही वाचा – IND vs ENG : धक्कादायक! नितीश रेड्डी बेन स्टोक्सचा वेगवान बाउन्सर लागल्याने कोसळला
गिलचा इशारा क्राउलीला खटकला –
That will be stumps on Day 3 at Lord’s!
End of a gripping day of Test cricket 🙌
England 2/0 in the 2nd innings, lead by 2 runs.
Scorecard ▶️ https://t.co/X4xIDiSUqO#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/wtWmKXl5nD
— BCCI (@BCCI) July 12, 2025
शुबमन गिलचा इशारा क्राउलीला खूपच खटकला. क्राउली चिडून प्रत्युत्तर देताना बोट दाखवून काही तरी म्हणाला. दुसरा इंग्लिश फलंदाज बेन डकेट भारतीय कर्णधार शुबमन गिलला शांत करण्याचा प्रयत्न होता. त्याचबरोबर मोहम्मद सिराज आणि केएल राहुलही चांगलेच संतापलेले दिसत होते. ते दोघे पण क्राउलीला काही तिखट शब्द बोलताना दिसले.





