IND vs ENG : ‘हा आमच्या योजनेचा भाग होता, पण…’, जो रूटसोबतच्या वादाबद्दल प्रसिध कृष्णाचा मोठा खुलासा

IND vs ENG Prasidh Krishna clarification about Argument : केनिंग्टन ओव्हल येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात दमदार कामगिरी केली. भारताने पहिल्या डावात २२४ धावा केल्या, तर इंग्लंडला २४७ धावांवर रोखण्यात यश मिळवले. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ४-४ विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजांना जेरीस आणले. यानंतर प्रसिध कृष्णाने जो रुटबरोबर झालेल्या वादाबद्दल खुलासा केला.
जो रूट आणि प्रसिध कृष्णा यांच्यात का झाला वाद?
इंग्लंडच्या डावादरम्यान २२व्या षटकात इंग्लिश फलंदाज जो रूट आणि भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा यांच्यात शाब्दिक चकमक झाली. जो रूट २९ धावांवर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी प्रसिध कृष्णाने या वादावर बीबीसीशी बोलताना खुलासा केला.
Prasidh Krishna about the sledge with his friend Joe Root. 😄#JoeRoot #PrasidhKrishna #INDvsENG pic.twitter.com/ErLsT8CgM7
— RIcky (@Rickycricketr) August 2, 2025
प्रसिध कृष्णा म्हणाला, “मला माहीत नाही रूटने असे का केले. मी फक्त इतकेच म्हटले की, तू चांगल्या फॉर्मात दिसतो आहेस, पण त्यानंतर ही चर्चा शिवीगाळ आणि वादात बदलली.” प्रसिध कृष्णाने कबूल केले की, रूटला स्लेज करण्याचा प्लॅन भारतीय संघाने आखला होता, पण त्यांना रूटकडून इतक्या तीव्र प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती.
हेही वाचा – IND vs ENG : मोहम्मद सिराजची कमाल! सचिन-हार्दिकला मागे टाकत केला खास पराक्रम
बुमराहच्या अनुपस्थितीवर कृष्णाची प्रतिक्रिया –
प्रसिध कृष्णाला बुमराहच्या अनुपस्थितीबाबतही प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, “बुमराह खेळला किंवा नाही, आम्हाला आमची भूमिका माहीत आहे. मी इथे निवडलो गेलो आहे कारण मी माझे काम करू शकतो. जर मी खेळू शकलो नाही, तर मला माझ्या रणनीतीवर काम करावे लागेल. मी इथे संघासाठी काम करण्यासाठी आलो आहे. माझ्यासाठी ही एक प्रक्रिया आहे, फक्त प्रदर्शन नाही.” भारतीय गोलंदाजांच्या या दमदार कामगिरीमुळे सामन्याला रंगत आली असून, पुढील खेळ कसा रंगेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





