IND vs ENG : मोहम्मद सिराजची कमाल! सचिन-हार्दिकला मागे टाकत केला खास पराक्रम

IND vs ENG Mohammed Siraj Complete 200 Wickets : भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ च्या अंतिम कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आणखी एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. केनिंग्टन ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सिराजने आपल्या शानदार गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांना हैराण केले आणि ४ विकेट्स घेत भारताच्या पुनरागमनात महत्त्वाची भूमिका बजावली. यासह त्याने सचिन आणि हार्दिकला मागे टाकले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० विकेट्स पूर्ण –
मोहम्मद सिराजने या सामन्यात आपली पहिला विकेट घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० विकेटांचा टप्पा गाठला. यासह तो भारताकडून हा टप्पा गाठणारा २५ वा क्रिकेटपटू ठरला. विशेष म्हणजे, या कामगिरीदरम्यान त्याने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांना मागे टाकले.
Mohammed Siraj becomes the 15th Indian pacer to complete 200 wickets in international cricket!
Surpassing Hardik Pandya and joins the elite club of legends. From grit to glory – Siraj rise is nothing short of inspiring!#MohammedSiraj #CricketLovers pic.twitter.com/y9T3vXqIj8
— Dream Comparison (@dreamcomparison) August 2, 2025
सिराजने इंग्लंडच्या पहिल्या डावात ८६ धावांत ४ विकेट्स घेतले. प्रसिद्ध कृष्णासोबत मिळून त्याने इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांत गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. यासह त्याने सचिन तेंडुलकर (६६४ सामन्यांत २०१ विकेट्स) आणि हार्दिक पंड्या (२०२ विकेट्स) यांना भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याच्या यादीत मागे टाकले.
हेही वाचा – IND v ENG : ‘आम्ही फक्त गप्प खेळून घरी जाऊ का…’, केएल राहुल अंपायरवर इतका का संतापला? पाहा VIDEO
१८ विकेट्ससह मालिकेत पटकावले अव्वल स्थान –
मोहम्मद सिराजच्या नावावर आता २०३ आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. तो भारताकडून २०० विकेट्स घेणारा १४ वा वेगवान गोलंदाज ठरला आहे. २०१७ मध्ये भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या सिराजने आतापर्यंत कसोटीत ११७, वनडेत ७१ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या आहेत. या इंग्लंड दौऱ्यावर सिराजने गोलंदाजीने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक १८ विकेट्स घेत इंग्लंडच्या बेन स्टोक्सला मागे टाकत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान मिळवला आहे.





