IND vs ENG : धक्कादायक! नितीश रेड्डी बेन स्टोक्सचा वेगवान बाउन्सर लागल्याने कोसळला

IND vs ENG Nitish Reddy Hit by Stokes Bouncer : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३८७ धावा केल्या. भारतानेही पहिल्या डावात ३१६ धावा केल्या असून, नितीश रेड्डी आणि रविंद्र जडेजा खेळपट्टीवर आहेत. मात्र, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक मोठी घटना घडली, एक वेगवान चेंडू नितीश रेड्डीच्या हेल्मेटला लागला आणि तो खाली कोसळला.
नितीश रेड्डी चेंडू लागल्याने कोसळला –
भारताच्या डावातील ९०वे षटक बेन स्टोक्सने टाकले. या षटकातील पहिल्या चेंडूवर रविंद्र जडेजाने एक धाव घेतली. दुसरा चेंडू नितीश रेड्डीने खेळला, जो एक शॉर्ट बॉल होता. स्टोक्सचा चेंडू थेट नितीशच्या हेल्मेटला लागला, आणि त्यामुळे मोठा आवाज झाला. नितीश खाली कोसळला, पण लगेच उठून त्यांनी इंग्लंडच्या कर्णधाराला हाताने ‘ठीक आहे’ असा इशारा केला.
Nitish Kumar Reddy hit on the head!! Prime test cricket at Lords pic.twitter.com/lI4YZxFgpl
— The Reverse Sweep (@trspodcastt) July 12, 2025
नितीशचे बदलावे लागले हेल्मेट –
Importance of helmet..!🙄
Helmet save lives either on pitch or on the road..‼️#RoadSafety #INDvsENG #ENGvsIND #Helmet #TestCricket #NitishReddy #Cricket #LordsTest pic.twitter.com/x98s98mzAP
— HUBBALLI DHARWAD CITY POLICE (@compolhdc) July 12, 2025
या घटनेमुळे खेळ काही वेळ थांबवण्यात आला. फिजिओ आणि पंचांनी नितीशला घेरले. नितीशच्या गालावर बर्फ लावला गेला आणि त्याचे हेल्मेट बदलण्यात आले. शार्दूल ठाकुर नवीन हेल्मेट घेऊन आला. नितीशने षटकातील तिसऱ्या चेंडूचा सामना केला आणि त्यावर एक धाव घेतली.
हेही वाचा – IND vs ENG : ऋषभ पंतच्या Run Out ने भारताला मोठा धक्का, केएल राहुलच्या चुकीमुळे गमावली मोठी विकेट!
केएल राहुलने झळकावले दमदार शतक –
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ३८७ धावा केल्या होत्या. भारताची सुरुवात चांगली झाली नाही, यशस्वी जैस्वाल अवघ्या १३ धावांवर बाद झाला. पण केएल राहुलने एक बाजू सांभाळली. त्याने ऋषभ पंतसोबत १०७ धावांची भागीदारी केली. राहुलने १०० धावा, तर पंतने ७४ धावांची खेळी केली. सध्या रविंद्र जडेजा ४० धावा आणि नितीश रेड्डी २५ धावांसह खेळपट्टीवर आहे. भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात ३१६ धावा केल्या असून, ते इंग्लंडपेक्षा ७१ धावांनी मागे आहेत.





