IND vs ENG : नितीश रेड्डीने क्रॉलीला आणलं गुडघ्यावर, भारताचा लॉर्ड्सवर दबदबा!

IND vs ENG Nitish Reddy take Zak Crawley Wicket : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जात आहे. ज्यामध्ये इंग्लंडने पहिल्या डावात ३८७ धावा केल्या होत्या, तर प्रत्युत्तरात भारतानेही ३८७ धावा करत चोख प्रत्युत्तर दिले. आता चौथ्या दिवशी इंग्लंड दुसऱ्या डावात फलंदाजी करत असून त्याची सुरुवात खराब झाली. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रात वर्चस्व राखत इंग्लंडचे चार गडी बाद केले. यामध्ये टीम इंडियाला नडणाऱ्या क्रॉलीला नितीश रेड्डीने बाद केले.
गिल-क्रॉली यांच्यात झाला होता वाद –
तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा फलंदाज जॅक क्रॉलीने वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न केला. तो कधी मैदानाबाहेर गेला, तर कधी फलंदाजीसाठी तयार नव्हता. यामुळे त्याची भारतीय कर्णधार शुबमन गिल शी बाचाबाची झाली होती. चौथ्या दिवशी नीतीश रेड्डीने क्रॉलीला बाद करत त्याची खेळी संपुष्टात आणली. क्रॉलीने ४९ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या, पण मोठी खेळी करू शकला नाही.
नितीश रेड्डीने क्रॉलीला आणले गुडघ्यावर –
An inspired bowling change! 😍@NKReddy07 gets into the attack & makes an instant impact to get #ZakCrawley caught by @ybj_19! 👏🏻#ENGvIND 👉 3rd TEST, DAY 4 | LIVE NOW on JioHotstar 👉 https://t.co/vo6bbH9n2o pic.twitter.com/zXWleizr4H
— Star Sports (@StarSportsIndia) July 13, 2025
इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील १५वे षटक नीतीश रेड्डीने टाकले. या षटकातील चौथा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. क्रॉलीने ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूने त्याच्या बॅटचा किनारा घेतला आणि यशस्वी जैस्वालच्या हातात गेला. जैस्वालने यावेळी उत्कृष्ट झेल पकडला, जरी या मालिकेत त्याची क्षेत्ररक्षणाची कामगिरी फारशी चांगली नव्हती. क्रॉली बाद झाल्यावर गुडघ्यांवर बसला. यानंतर भारतीय संघाने एकच जल्लोष केला.
हेही वाचा – IND vs ENG : आकाश दीपने हॅरी ब्रूकला दाखवले दिवसा तारे! उडवला मधला स्टंप, VIDEO व्हायरल
इंग्लंडने घेतली १३३ धावांची आघाडी –
इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. मोहम्मद सिराजने बेन डकेटला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, तर ओली पोपलाही त्याने फार वेळ टिकू दिले नाही. आकाश दीपने हॅरी ब्रूकला क्लीन बोल्ड केले, ज्याने २३ धावा केल्या. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रानंतर इंग्लंडने ४ गडी गमावून १३३ धावा केल्या आहेत. सध्या कर्णधार बेन स्टोक्स १४ धावांवर आणि जो रूट १७ धावांवर खेळत आहेत.





