IND vs ENG : आकाश दीपने हॅरी ब्रूकला दाखवले दिवसा तारे! उडवला मधला स्टंप, VIDEO व्हायरल

IND vs ENG Akash Deep clean bowled Harry Brook : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना खूपच रोमांचक झाला आहे. इंग्लंडचा दुसरा डाव अडचणीत सापडला आहे. दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीपर्यंत त्यांनी चार महत्त्वाचे गडी गमावले. मोहम्मद सिराजने बेन डकेटला १२ आणि ओली पोपला ४ धावांवर बाद केले. झॅक क्रॉलीने २२ धावा केल्या, पण नितीश रेड्डीने त्याला बाद केले. जगातील नंबर एक फलंदाज हॅरी ब्रूकने १९ चेंडूंमध्ये २३ धावा करत ४ चौकार आणि १ षटकार मारला, पण तोही टिकला नाही.
आकाश दीपने ब्रूकला केले क्लीन बोल्ड –
चौथ्या दिवशी इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. ५० धावांवर तीन गडी बाद झाले होते. ब्रूक मैदानात आला आणि त्याने आक्रमक फलंदाजी केली. पण आकाशदीपच्या गोलंदाजीसमोर तो चुकला. स्वीप शॉट खेळताना त्याचा अंदाज चुकला आणि आकाशदीपच्या शानदार चेंडूने मधल यष्टी उडवत तंबूचा रस्ता दाखवला, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
Relentless and rewarded! 🙌🏻👏🏻#AkashDeep’s disciplined length proves too good for #HarryBrook, as a costly shot sends his middle-stump flying! 🔥#ENGvIND 👉 3rd TEST, DAY 4 | LIVE NOW on JioHotstar 👉 https://t.co/vo6bbH9n2o pic.twitter.com/xIL09UHRtR
— Star Sports (@StarSportsIndia) July 13, 2025
इंग्लंडचा दुसरा डाव सापडला संकटात –
𝙏. 𝙄. 𝙈. 𝘽. 𝙀. 𝙍
Akash Deep hits the woodwork! 👌
He’s absolutely pumped! 💪
Harry Brook departs as England lose their 4th wicket!
Updates ▶️ https://t.co/X4xIDiSmBg#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/aRyvyFeoPr
— BCCI (@BCCI) July 13, 2025
चौथ्या दिवसाच्या दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीपर्यंत इंग्लंड संघ पूर्णपणे संकटात सापडला आहे. ९८ धावांवर त्यांनी चार मोठे गडी गमावले आहेत. मोहम्मद सिराजने पहिल्या सत्रात अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ७ षटकांत फक्त ११ धावा देत दोन गडी बाद केले. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांची जोडीही शानदार लयीत दिसली.
हेही वाचा – IND vs ENG : सिराजने विकेट घेतल्यानंतर आक्रमक सेलिब्रेशन करत डकेटला दिला धक्का, VIDEO होतोय व्हायरल
बर्मिंगहम कसोटी सामन्यात आकाशदीपने हॅरी ब्रूकला दोन्ही डावांमध्ये बाद केले. पहिल्या डावात ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनी ३०० धावांची मोठी भागीदारी रचली होती. पण, आकाशदीपने अप्रतिम गोलंदाजी करत ब्रूकला त्रिफळाचीत (क्लीन बोल्ड) केले आणि भारताला मोठा ब्रेकथ्रू मिळवून दिला. दुसऱ्या डावातही आकाशदीपने आपली कमाल दाखवली आणि ब्रूकला पायचीत (LBW) करून बाद केले.





