IND vs ENG : ‘आता खेळना बॅझबॉल, मला बघायचयं…’, सिराजने रुटला दिलं ओपन चॅलेंज, VIDEO व्हायरल

IND vs ENG Siraj sledging to Joe Root : गेल्या तीन वर्षांपासून इंग्लंडची टीम कसोटी क्रिकेटमध्येही एकदिवसीय सामन्यांप्रमाणे खेळताना दिसत होती. मात्र, बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातील पराभवानंतर बरेच काही बदलले आहे. लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लिश फलंदाजांनी आपली खेळण्याची शैली बदलली आहे. यामुळेच भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने स्लेजिंग सुरू करायला सुरुवात केली. त्याने दिग्गज फलंदाज जो रूट याला थेट आव्हान दिले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सिराजने जो रूटला दिले आव्हान –
बॅझबॉलच्या काळात इंग्लंडची टीम ७२ वेळा फलंदाजीसाठी उतरली आहे. यापैकी केवळ दुसऱ्यांदा असे घडले आहे की, इंग्लंडच्या संघाने पहिल्या ४० षटकांमध्ये तीन पेक्षा कमी नेट रन रेटने धावा केल्या आहेत. याआधी असे २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या डावात घडले होते, जेव्हा संघाने संथ खेळ केला होता. मात्र, आज सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडचा संघ दडपणाखाली दिसत आहे.
Siraj on the wind up 😅 pic.twitter.com/v2ea76PFIp
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 10, 2025
या सामन्यात दिग्गज फलंदाज जो रूट सातत्याने चेंडू न खेळता सोडताना दिसत आहे. त्यामुळे मोहम्मद सिराजने त्याला स्लेजिंग केली. भारताचा वेगवान गोलंदाज म्हणाला, “बॅझ, बॅझ, बॅझबॉल. आता खेळना बॅझबॉल. मला बघायचयं .” मात्र, स्लेजिंगनंतरही रूट संथ गतीने फलंदाजी करताना दिसत आहे. तो १४२ चेंडूंत ७२ धावांवर आणि स्टोक्स ४२ चेंडूत २० धावांवर खेळत आहे. या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा –IND vs ENG : जो रुटने भारताविरुद्ध रचला इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज
इंग्लंडच्या फलंदाजांनी सिराज-बुमराहविरुद्ध आक्रमक खेळणे टाळले –
MOHAMMAD SIRAJ TO JOE ROOT:
– “Baz, Baz, Bazball. Play Bazball. I want to see”. 😀👌 pic.twitter.com/WaUBGpLp2e
— Tanuj (@ImTanujSingh) July 10, 2025
आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाणारे इंग्लिश फलंदाज या सामन्यात सावधपणे खेळत आहेत. पहिल्या चार फलंदाजांपैकी तिघांनी ५० पेक्षा कमी स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे, तर चौथ्या फलंदाजाचा स्ट्राइक रेटही ६० पेक्षा कमी आहे. दुसरीकडे, स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने १३ षटकांत केवळ २१ धावा दिल्या आहेत, तर मोहम्मद सिराजने ११ षटकांत फक्त २५ धावा दिल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी आणि आकाशदीप यांनीही फलंदाजांना संथ खेळण्यास भाग पाडले आहे. बातमी लिहेपर्यंत इंग्लंडच्या संघाने ४ बाद गमावून २०१ धावा केल्या आहेत.





