India vs England 5 Match Test Series Live Streaming : इंग्लंडचा संघ प्रदीर्घ सराव शिबिरानंतर भारतात दाखल झाला आहे. येथेही या संघाने सराव सुरू केला आहे. दुसरीकडे भारतीय खेळाडूंनाही चांगलाच घाम फुटला आहे. दोन्ही संघ पुढील दीड महिना लाल चेंडूंच्या मालिकेत व्यस्त असतील. या दीड महिन्यात हे दोन्ही संघ एकूण 5 कसोटी सामने खेळणार आहेत. येथे इंग्लंड संघ आपल्या बेसबॉल शैलीने टीम इंडियाच्या मजबूत घरच्या कसोटी विक्रमाला आव्हान देईल. अशा परिस्थितीत या मालिकेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
टीम इंडियाने गेल्या 11 वर्षांपासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. टीम इंडियाचा शेवटचा पराभव आपल्याच भूमीवर इंग्लंडविरुद्ध झाला. 2012 मध्ये इंग्लंडने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव केला होता. त्यामुळेच या मालिकेबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
कसोटी मालिका कधी सुरू होत आहे?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 25 जानेवारी रोजी होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सकाळी 9.30 वाजता या कसोटीतील पहिला चेंडू टाकला जाईल.
सामन्याचे वेळापत्रक काय?
पहिला सामना 25 ते 29 जानेवारी दरम्यान हैदराबादमध्ये, दुसरा सामना 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणममध्ये, तिसरा सामना 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राजकोटमध्ये, चौथा सामना 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान रांचीमध्ये आणि पाचवा सामना 7 ते 11 मार्च दरम्यान धर्मशाला येथे होणार आहे. सर्व सामने दिवसा खेळवले जातील.
लाइव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे पाहू शकाल?
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स-18 आणि कलर्स सिनेप्लस चॅनेलवर होईल. येथे इंग्रजी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकण्याचा पर्याय असेल. त्याचप्रमाणे, लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर असेल. येथेही इंग्रजी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषांसोबत भोजपुरी आणि पंजाबी कॉमेंट्री ऐकण्याचा पर्याय असेल.