IND vs ENG : SENA देशांत जसप्रीत बुमराहची जादू कायम, वसीम अक्रमला मागे टाकत रचला इतिहास

IND vs ENG Jasprit Bumrah surpasses Wasim Akram : लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने आपली छाप पाडली. भारताने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या, त्याला प्रत्युत्तर देताना यजमान इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ३ बाद २०९ धावा केल्या. या तिन्ही विकेट्स जसप्रीत बुमराहने एक मोठा पराक्रम केला आहे. तो SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे.
बुमराह ठरला सेना राष्ट्रांचा सेनापती –
जसप्रीत बुमराहने पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमला मागे टाकले. अक्रमने आपल्या कारकीर्दीत SENA देशांमध्ये एकूण १४६ विकेट्स घेतल्या होत्या, तर आता जसप्रीत बुमराहच्या नावावर या देशांमध्ये १४८ विकेट्स झाल्या आहेत. जसप्रीत बुमराहच्या विकेट्ससोबतच त्याची सरासरी देखील लक्षवेधी आहे. बुमराहने १४८ विकेट्स केवळ २०.९२ च्या सरासरीने घेतल्या आहेत, तर वसीम अक्रम याची सरासरी २४.११ होती.
Team India dominates SENA nations like no other Asian team! 🇮🇳🌍🔥
Rishabh Pant surpasses MS Dhoni’s record of 109 dismissals! 🧤#SachinTendulkar #JaspritBumrah #RishabhPant #Sportskeeda pic.twitter.com/tN3B2ujW1F
— Sportskeeda (@Sportskeeda) June 22, 2025
SENA देशांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-५ गोलंदाजांपैकी चार भारतीय आहेत. जसप्रीत बुमराह याच्यासह या यादीत अनिल कुंबले, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांचा समावेश आहे.
आशियाई गोलंदाजांनी SENA देशांमध्ये घेतलेल्या सर्वाधिक विकेट्स :
The cynosure of all eyes, Boom Boom Bumrah 🔥#TeamIndia | #ENGvIND | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/zC5gIrIw5D
— BCCI (@BCCI) June 21, 2025
- जसप्रीत बुमराह – १४८*
- वसीम अक्रम – १४६
- अनिल कुंबळे – १४१
- इशांत शर्मा – १३०
- मोहम्मद शमी – १२३
हेही वाचा – Rohit Sharma : हिटमॅनला आयुष्यात कोणत्या गोष्टीचा आहे पश्चात्ताप? स्वत:च केला खुलासा, पाहा VIDEO
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, तिसऱ्या दिवशी वृत्तलिहिपर्यंत ७६ षटकानंत ५ बाद ३१९ धावा केल्या आहेत. हॅरी ब्रूक (५४) आणि जेमी स्मिथ (२८) खेळत आहे. तत्पूर्वी सिराजने इंग्लंडला पाचवा धक्का दिला. त्याने कर्णधार बेन स्टोक्सला झेलबाद केले. तो ५२ चेंडूत तीन चौकारांसह २० धावा काढल्यानंतर बाद झाला. स्टोक्सने ब्रूकसोबत पाचव्या विकेटसाठी ५१ धावा जोडल्या. आता जेमी स्मिथ क्रीजवर आला आहे.





