IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत शुबमन गिल आणि अंपायरची जुंपली, काय होतं कारण? पाहा VIDEO

IND vs ENG Shubman Gill Angry on Umpire video viral : इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाने दमदार सुरुवात केली. विशेषतः जसप्रीत बुमराहने सलग तीन विकेट घेत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. पहिल्या दिवसाच्या खेळात इंग्लंडने 82 षटकांत 4 गडी गमावून 251 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाच्या 10 षटकांनंतर भारतीय कर्णधार शुबमन गिल याने चेंडू बदलण्याची मागणी अंपायरकडे केली, परंतु अंपायरने ती नाकारली. यामुळे शुबमन गिल अंपायरवर नाराज झाला.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यापूर्वीही भारतीय संघाने चेंडूबाबत अंपायरकडे तक्रार केली होती. दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर चेंडू सुमारे 10 षटके जुना झाला होता. यामुळेच कर्णधार शुबमन गिलने चेंडू बदलण्याची मागणी केली. मात्र, अंपायरने चेंडू तपासला आणि तो खेळण्यायोग्य असल्याचे मत व्यक्त करत कर्णधार गिलची मागणी फेटाळली.
गिल-अंपायरमध्ये तीव्र शाब्दिक चकमक –
Ricky Ponting Reborn 🥶🥶🥶 pic.twitter.com/8tBhIb8cwl
— naym (@77Abdddd) July 11, 2025
लॉर्ड्स कसोटी सामन्यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल अंपायरने चेंडू बदलण्याच्या मागणीला नकार दिल्याने प्रचंड संतापला. गिल आणि अंपायर यांच्यात काही काळ तीव्र शाब्दिक चकमक झाली. गिलसोबत मोहम्मद सिराज यानेही स्टंप माइकवरून सांगितले की, चेंडू खरोखरच 10 षटकं जुना झाला आहे. तरीही अंपायरने कोणताही बदल न करता खेळ सुरू ठेवण्याचे आदेश दिले. या घटनेमुळे काही काळ मैदानावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
हेही वाचा – Wimbledon 2025 : मोठा उलटफेर! सबालेंकाचा पराभव करत अनिसिमोवाची फायनलमध्ये धडक, स्वियातेकशी होणार सामना
भारतीय संघाला मिळाल्या तीन महत्त्वाच्या विकेट्स –
Shubman Gill and India unhappy with the umpires. pic.twitter.com/92qt99sRHQ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 11, 2025
लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मैदानावर उतरताच इंग्लंडच्या जो रूटने आपले शतक पूर्ण केले. पण इंग्लंडचा हा आनंद फार काळ टिकला नाही. जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला बाद केले. त्यानंतर रूटही बुमराहच्या वेगवान गोलंदाजीचा बळी ठरला. त्यानंतर ख्रिस वोक्सलाही बाद केले, ज्याला आपले खातेही उघडता आले नाही. सामन्याबद्दल बोलायचे तर वृत्त लिहिपर्यंत इंग्लंड संघाने 9 बाद 370 धावा केल्या आहेत.





