IND vs ENG : एजबॅस्टन कसोटीपूर्वी गंभीरचा मास्टरप्लॅन: बुमराहच्या खेळण्यावर मोठा निर्णय

IND vs ENG Gautam Gambhir on Jasprit Bumrah : लीड्स कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीरने खेळाडूंच्या वर्कलोडवर स्पष्ट मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, जसप्रीत बुमराह तीन कसोटी सामने खेळेल. त्याच्या मते, बुमराहचा वर्कलोड व्यवस्थापित करणे खूप महत्वाचे आहे. तो पुढे म्हणाला, बुमराहचा वर्कलोड व्यवस्थापित करणे आमच्यासाठी महत्वाचे आहे. पुढे बरेच क्रिकेट बाकी आहे. या दौऱ्यावर येण्यापूर्वीच आम्ही तो तीन कसोटी सामने खेळेल असे ठरवले होते.
गौतम गंभीर म्हणाला, बुमराह उर्वरित कोणते दोन कसोटी सामने खेळेल हे आम्ही अद्याप ठरवलेले नाही. त्याने कसोटी मालिकेसाठी संघ घोषित केला तेव्हाच बीसीसीआयला त्याच्या दुखापतीबद्दल कळवले होते. तो सर्व सामने खेळू शकणार नाही. त्यानंतर तो किती सामने खेळेल हा प्रश्न होता ज्याचं उत्तर पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने दिले.
दुखापती व्यवस्थापनावर गंभीर काय म्हणाला?
🚨 UPDATE ON INDIA’S PRACTICE SESSION TODAY 🚨 (Sahil Malhotra).
– Bumrah & Prasidh not spotted.
– Rest of the team there for practice.
– Siraj worked a lot on his batting.
– Long chats between Gambhir & Arshdeep, Akash Deep. pic.twitter.com/K0PE0e4PCZ— Tanuj (@ImTanujSingh) June 27, 2025
गंभीर म्हणाला की, ‘मी दुखापती व्यवस्थापनावर कधीच विश्वास ठेवला नाही, जर तुम्हाला दुखापत झाली तर तुम्ही बरे व्हा आणि संघात परत या. जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता तेव्हा तुम्ही शक्य तितके प्रयत्न केले पाहिजेत. दुखापत ही खेळाडूच्या कारकिर्दीचा एक भाग आहे. काही खेळाडूंना फक्त कसोटीसाठी ठेवण्यावर माझा जास्त विश्वास नाही आणि आम्ही त्यांच्या दुखापतींचे व्यवस्थापन करतो. जर तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये असाल तर तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळा.’
हेही वाचा – IND vs ENG : ‘शार्दुलच्या जागी कुलदीपला संधी द्या…’, बर्मिंगहॅम कसोटीसाठी माजी खेळाडूने दिला सल्ला
हे स्पष्ट आहे की आता गौतम गंभीरचा मुद्दा पूर्णपणे उलट आहे. आता भारतीय संघाला एजबॅस्टनमध्ये पुढची लढाई लढायची आहे, दुसरा सामना २ जुलैपासून सुरू होईल. या सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये इतरही काही बदल पाहायला मिळू शकतात. आता भारतीय संघ पुनरागमन करू शकते की नाही हे पाहायचे आहे.





