IND vs ENG : ऑस्ट्रेलियात टीका, इंग्लंडविरुद्ध कमबॅक; पंतने गावस्करांना कौतुक करण्यास पाडले भाग! पाहा VIDEO

IND vs ENG Sunil Gavaskar on Rishabh Pant Century : भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता, तेव्हा स्टार फलंदाज अपयशी ठरत होते आणि सर्वजण विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंतकडून अपेक्षा ठेवत होते. मात्र, त्या वेळी पंतने अत्यंत खराब फटका खेळून आपली विकेट गमावली. त्यामुळे माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांना त्याचा राग आवरता आला नाही आणि ते पंतवर संतापले. आता, इंग्लंडविरुद्ध शानदार फलंदाजी करून ऋषभ पंतने गावस्कर यांना आपले कौतुक करण्यास भाग पाडले आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पंतवर भडकले होते सुनील गावस्कर –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात स्टार फलंदाज ऋषभ पंत २८ धावांवर सेट झालेला दिसत होता. त्यावेळी सर्वांना अपेक्षा होती की पंत मोठी खेळी करेल, पण तसे झाले नाही. २८ धावांच्या स्कोअरवर ऋषभ पंतने अत्यंत खराब शॉट खेळून आपली विकेट फेकली. हे पाहून त्या वेळी समालोचन कक्षात बसलेले दिग्गज सुनील गावस्कर म्हणाले होते, ‘मूर्ख! मूर्ख! मूर्ख! त्याने (भारताच्या) ड्रेसिंग रूममध्ये जाऊ नये. त्याने दुसऱ्या ड्रेसिंग रूममध्ये जावे!’
From “stupid stupid stupid”
To “superb superb superb”We’ve came a long way 🤣❤️pic.twitter.com/NR3oBE8P2j
— CricketDekhNa🇮🇳 (@cricketdekhna) June 21, 2025
आज जेव्हा इंग्लंडविरुद्ध ऋषभ पंतने अत्यंत आक्रमक शैलीत फलंदाजी करत शतक ठोकले, तेव्हा सुनील गावस्करने पंतचे कौतुक करताना म्हणाले, ‘अप्रतिम! अप्रतिम! अप्रतिम!’ या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा – IND vs ENG : ऋषभने शतकानंतर कोलांटी उडी मारत वेधलं लक्ष, इंग्लिश खेळाडूंसह प्रेक्षकही थक्क, पाहा VIDEO
ऋषभ पंतचे शानदार कमबॅक –
आयपीएल २०२५ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला २७ कोटींना खरेदी केले होते. तिथे पंत फलंदाज आणि कर्णधार म्हणून पूर्णपणे अपयशी ठरला. यामुळे त्याला दोन महिने सातत्याने टीकेचा सामना करावा लागला. हंगामाच्या शेवटच्या सामन्यात पंतने शतक झळकावले होते. त्याच फॉर्मला त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही कायम ठेवले आहे.
हेही वाचा – IND vs ENG : ऋषभ पंतने उत्तुंग षटकारासह ठोकले दमदार शतक, मोडला धोनीचा सर्वात मोठा विक्रम!
भारतीय संघाचा पहिला डाव ४७१ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांनी शतके झळकावली, तर के.एल. राहुलने ४२ धावांची खेळी केली. या चार फलंदाजांव्यतिरिक्त इतर कोणालाही विशेष प्रभाव पाडता आला नाही. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोश टंग यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या, तर ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाली.





