IND vs ENG : ऋषभ पंतने उत्तुंग षटकारासह ठोकले दमदार शतक, मोडला धोनीचा सर्वात मोठा विक्रम!

IND vs ENG Rishabh Pant 7th Test century : इंग्लंडच्या भूमीवर ऋषभ पंतने आणखी एक शतक झळकावले आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारताच पंतने लीड्सच्या मैदानावर शानदार खेळी केली. या विकेटकीपर फलंदाजाने कसोटी क्रिकेटमधील आपले सातवे शतक झळकावले आहे. पंतने षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. यासह, पंत यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने एमएस धोनीला मागे टाकले आहे.
ऋषभ पंतने मोडला धोनीचा विक्रम –
एमएस धोनीने भारतासाठी ९० कसोटी सामने खेळले. या काळात त्याच्या बॅटमधून ६ शतके निघाली. यातील एकही शतक आशियाबाहेर आलेले नाही. आता पंतने कसोटीत ७ शतके पूर्ण केली आहेत. यासह, पंत कसोटीत सर्वाधिक शतके करणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाजही बनला आहे. त्याने इंग्लंडमध्ये तीन, दक्षिण आफ्रिकेत एक आणि ऑस्ट्रेलियात एक शतके झळकावली आहेत.
पंत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा यष्टिरक्षक-फलंदाज –
A maximum to get to his century in style 💯
3rd Test Hundred in England for vice-captain Rishabh Pant 👏👏
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @RishabhPant17 pic.twitter.com/txmdcvSrfS
— BCCI (@BCCI) June 21, 2025
ऋषभ पंतसमोर इंग्लंडचे गोलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत होते. पहिल्या दिवशी ६५ धावांवर नाबाद राहिलेल्या ऋषभ पंतने दुसऱ्या दिवशीही आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी सुरू ठेवली. पंतने कर्णधार गिलसोबत मिळून इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पंतने शोएब बशीरच्या एकाच षटकात आधी चौकार आणि नंतर षटकार लगावला. पंतने आपले सातवे कसोटी शतक १४५ चेंडूंमध्ये पूर्ण केले. या शतकासह पंत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा यष्टिरक्षक-फलंदाज ठरला आहे.
HUNDRED for Vice-captain Rishabh Pant! 🫡
His 7th TON in Test cricket 👏👏
4⃣0⃣0⃣ up for #TeamIndia in the 1st innings 👌👌
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#ENGvIND | @RishabhPant17 pic.twitter.com/IowAP2df6L
— BCCI (@BCCI) June 21, 2025
ऋषभ पंतच्या बॅटमधून २०२५ मध्ये निघालेले हे कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक आहे. पंतने शोएब बशीरच्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकत आपले शतक साजरे केले. दुसऱ्या बाजूने कर्णधार शुबमन गिलने त्याला उत्तम साथ दिली. पंतने आक्रमक दृष्टिकोन अवलंबला, तर गिलने संयमी भूमिका निभावली.





