IND vs ENG : अखेर रवींद्र जडेजाची झुंज ठरली अपयशी! चुरशीच्या सामन्यात इंग्लंडने मारली बाजी

IND vs ENG England Defeat India by 22 Runs : लॉर्ड्स येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टेस्ट सामन्यात इंग्लंडने 22 धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली. भारताला विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य होते, परंतु इंग्लंडने भारतीय संघाला 170 धावांत गारद करत सामना जिंकला. रवींद्र जडेजा शेवटपर्यंत नाबाद राहिला, मात्र तो भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.
भारतीय फलंदाजांनी केली निराशा –
भारतीय संघाच्या फलंदाजांनी या कसोटी मालिकेत ज्या पद्धतीने कामगिरी केली होती, त्यावरून सर्वांना वाटत होते की भारत 193 धावांचे लक्ष्य सहज गाठेल. पण कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात दडपणाचा स्तर वेगळाच असतो, आणि असेच काहीसे भारतीय फलंदाजी दरम्यान दिसले. चौथ्या डावात भारतीय फलंदाज दडपणाखाली पूर्णपणे कोलमडले. मग ते यशस्वी जैसेवाल असो, शुबमन गिल असो, किंवा करुण नायर, कोणीही खेळपट्टीवर फार टिकून फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला नाही. ज्याचा फटका भारतीय संघाला बसला.
End of a thrilling Test match at Lord’s.#TeamIndia fought hard but it’s England who win the 3rd Test by 22 runs.
Scorecard ▶️ https://t.co/X4xIDiSUqO#ENGvIND pic.twitter.com/KkLlUXPja7
— BCCI (@BCCI) July 14, 2025
रवींद्र जडेजाने एकट्याने लढवली खिंड –
A determined and well fought innings
Took #TeamIndia close
Chin up, Ravindra Jadeja 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/X4xIDiSmBg#ENGvIND | @imjadeja pic.twitter.com/jGpfgHAeNM
— BCCI (@BCCI) July 14, 2025
टॉप ऑर्डरमध्ये केएल राहुल आणि लोअर ऑर्डरमध्ये रवींद्र जडेजा यांनी काही प्रमाणात संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना इतर कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. शेवटी, भारताचा संपूर्ण संघ 170 धावांवर गारद झाला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर बेन स्टोक्स आणि ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या डावात जडेजा हा भारतीय फलंदाजीतील एकमेव हिरो ठरला. त्याने 181 चेंडूंमध्ये 61 धावा करत नाबाद परत येण्याची कामगिरी केली.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने 387 धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक 104 धावा केल्या, तर जेमी स्मिथने 51 आणि ब्रायडन कार्सने 56 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात भारतीय संघानेही पहिल्या डावात 387 धावाच केल्या. भारताकडून केएल राहुलने शतक झळकावले, तर ऋषभ पंतने 74 आणि रवींद्र जडेजाने 72 धावांची खेळी साकारली.
हेही वाचा – IND vs ENG : वैभव सूर्यवंशीची गोलंदाजीतही कमाल! सर्वात कमी वयात रचला इतिहास!
त्यानंतर इंग्लंड संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा त्यांच्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. त्यांचे गडी सातत्याने बाद होत गेले. या डावातही जो रूटने सर्वाधिक 40 धावा केल्या, तर कर्णधार बेन स्टोक्सने 33 आणि हॅरी ब्रूकने 23 धावा जोडल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 4 गडी बाद केले, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांवर आटोपला.





