IND vs ENG : इंग्लंडची दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर, काय केले बदल? जाणून घ्या

IND vs ENG 2nd Test England Announces Playing XI : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर, इंग्लंड संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. आता त्यांचे लक्ष भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकण्यावर आणि मालिकेत २-० ने आघाडी घेण्यावर आहे. त्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत, कोणाला संधी मिळाली आणि कोणाला संघाबाहेर ठेवण्यात आले ते जाणून घेऊया.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना २ जुलै ते ६ जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. ज्यासाठी इंग्लंडने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. जोफ्रा आर्चरलाही दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही.
जोफ्रा आर्चरच्या पुनरागमनाची प्रतिक्षा –
We’re ready to do it all again at @Edgbaston on Wednesday! 🏟 😍
— England Cricket (@englandcricket) June 30, 2025
गेल्या आठवड्यात दुसऱ्या कसोटीसाठी जोफ्रा आर्चरचा इंग्लंडच्या १५ जणांच्या संघात समावेश करण्यात आला होता. फेब्रुवारी २०२१ नंतर पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन होण्याची अपेक्षा होती. त्याने अलीकडेच ससेक्ससाठी रेड-बॉल क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि १८ षटकांत विकेट्स घेतली होती. परंतु कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे तो सोमवारी संघाच्या सराव सत्रात सामील होऊ शकला नाही. आता तो मंगळवारी संघाशी जोडला जाईल.
बर्मिंगहॅम कसोटीसाठी इंग्लंड संघात कोणताही बदल नाही –
२ जुलैपासून सुरू होणाऱ्या बर्मिंगहॅम कसोटीसाठी इंग्लंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदला केलेला नाही. बेन स्टोक्स त्याच संघाकडून खेळत आहे, ज्या संघासोबत त्याने भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकला होता. यावेळी संघाला ख्रिस वोक्स आणि शोएब बशीर संघासाठी चमकदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे संघात कोणताही बदल केलेला नाही.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर





