IND vs ENG : मालिका जिंकण्यासाठी इंग्लंडचा मास्टरप्लॅन! निर्णायक सामन्यासाठी ‘या’ खेळाडूला संघात केले सामील

IND vs ENG England Announces Squad for 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. आतापर्यंत या मालिकेतील चार सामने पूर्ण झाले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा सामना अनिर्णीत राहिला. आता अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील शेवटचा सामना ३१ जुलैपासून द ओव्हल येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंड संघाने एका दमदार खेळाडूला आपल्या संघात सामील करून घेतले आहे.
इंग्लंडने मालिकेतील अंतिम सामन्यासाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या संघात जेमी ओव्हरटनला स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडने १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. मँचेस्टर कसोटी अनिर्णीत राहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इंग्लंडने हा निर्णय घेतला.
जेमी ओव्हरटनला मिळाली पुनरागमनाची संधी –
🚨 ENGLAND SQUAD FOR 5TH TEST vs INDIA 🚨
Stokes (C), Root, Jofra, Atkinson, Bethell, Brook, Carse, Crawley, Dawson, Duckett, Overton, Pope, Jamie Smith, Tongue, Woakes. pic.twitter.com/jGYsidatLI
— Johns. (@CricCrazyJohns) July 28, 2025
इंग्लंडने पाचव्या कसोटी सामन्यासाठी फक्त एकच बदल केला आहे, तर उर्वरित १४ खेळाडू तेच आहेत जे मागील सामन्यात संघाचा भाग होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना त्याने ९८ सामन्यांत २३७ विकेट्स घेतले आहेत. तसेच, फलंदाजी करताना त्याने २४०१ धावा केल्या आहेत. त्याच्या या प्रभावी कामगिरीमुळे त्याला पुन्हा इंग्लंड संघात पुनरागमनाची संधी मिळाली आहे.
हेही वाचा – IND vs ENG : ऋषभ पंतच्या दुखापतीने भारताला धक्का; पाचव्या कसोटीसाठी युवा खेळाडूला दिली संधी
शेवटचा सामना होणार रंजक –
रविवारी ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात पाहुण्या भारतीय संघाने कडवी झुंज देत सामना अनिर्णीत राखला. यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही रोमांचक कसोटी मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मँचेस्टर कसोटीच्या अंतिम दिवशी भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी करत सामना वाचवला आणि मालिकेतही स्वतःला कायम ठेवले. आता त्यांच्यापुढे शेवटचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचे आव्हान आहे.
हेही वाचा – Divya Deshmukh : १९ वर्षीय दिव्याने रचला इतिहास: फिडे महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय ठरल्यानंतर भावुक
भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ:
बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, लियाम डॉसन, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.





