IND vs ENG : कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

IND vs ENG England squad announced for 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया लवकरच इंग्लंडला पोहोचणार आहे. भारताचा अ संघ सध्या तिथे आहे. बीसीसीआयने आधीच टीम इंडियाचा संघ जाहीर केला होता. आता इंग्लंडने पण मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. संघाची धुरा बेन स्टोक्स वाहणार आहे. त्याचबरोबर काही बलाढ्य खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. पहिल्या सामन्याला २० जूनपासून सुरुवात होणार आहे.
जिमी ओव्हरटनचे बऱ्याच काळानंतर पुनरागमन –
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने पहिल्या कसोटीसाठी जाहीर केलेल्या संघात १४ खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे जिमी ओव्हरटन बऱ्याच काळानंतर पुनरागमन करत आहे. त्याने २०२२ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता, जेव्हा तो न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता, आता तो भारतीय संघाविरुद्धही खेळताना दिसू शकतो. जेकब बेथेल, ख्रिस वोक्स आणि ब्रायडन कार्स यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. हे सर्व खेळाडू अलिकडेच झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यात संघाचा भाग नव्हते.
गस अॅटकिन्सनच्या जागी जेमी ओव्हरटनला संधी –
Ready for tussle! 👊🏻🏴
England have announced their squad for the 1st Test against #TeamIndia! 🙌🏻#ENGvIND | 1st Test starts 20th June, 2:30 PM, Streaming On JioHotstar! pic.twitter.com/PG1opjgJ0s
— Star Sports (@StarSportsIndia) June 5, 2025
गस अॅटकिन्सन हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर असल्याने जेमी ओव्हरटनला पहिल्या कसोटीसाठी बोलावण्यात आल्याचे मानले जाते. इंग्लंडला सुरुवातीला खात्री होती की अॅटकिन्सन पहिल्या कसोटीसाठी वेळेत दुखापतीतून बरा होईल, परंतु तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. मार्क वूड आणि ऑली स्टोन गुडघ्याच्या दुखापतीमुळे आधीच मालिकेतून बाहेर आहेत, तर जोफ्रा आर्चर अंगठ्याच्या समस्येमुळे दुसऱ्या कसोटीपर्यंत तंदुरुस्त होणार नाही.
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ:
बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, जेमी ओव्हरटन, जोश टंग, ख्रिस वोक्स.
हेही वाचा – RCB Victory Parade : बाहेर लोकांचा मृत्यू, आत आरसीबीचा विजयोत्सव…IPL च्या अध्यक्षांनी उपस्थित केले सवाल
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ :
शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक). जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.





