क्रिकेट विश्वावर शोककळा: IND vs ENG सामन्यादरम्यान इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाचे निधन

IND vs ENG David Lawrence Passes Away : भारत आणि इंग्लंड संघांत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंड आणि ग्लॉस्टरशायरचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड लॉरेन्स यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून मोटर न्यूरॉन रोगाने (MND) ग्रस्त होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. क्रिकेट जगतात त्यांना प्रेमाने ‘सिड’ असेही संबोधले जायचे.
डेव्हिड लॉरेन्स यांचा जन्म २८ जानेवारी १९६४ रोजी झाला होता. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी त्यांनी ग्लॉस्टरशायरकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यांच्या आक्रमक गोलंदाजीने लवकरच सर्वांचे लक्ष वेधले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी १७० प्रथम श्रेणी सामन्यांत ४७७ विकेट्स घेतल्या, यामध्ये वॉर्विकशायरविरुद्ध एका डावात ७ विकेट्स घेण्याची त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
लॉरेन्स यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
Rest in Peace David ‘Syd’ Lawrence MBE who has died aged 61.
The cricketer was the first British-born Black player to represent England
His death comes almost a year after he had been diagnosed with motor neurone disease (MND).
RIP #pioneer #davidlawrence #legacy 🏏🏏 pic.twitter.com/YKUmNkHmml
— The Voice Newspaper (@TheVoiceNews) June 22, 2025
आंतरराष्ट्रीय स्तरावर लॉरेन्सने १९८८ ते १९९२ या कालावधीत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. त्याने एकूण ५ कसोटी सामन्यांत भाग घेतला आणि १८ विकेट्स घेतल्या. १९९१ मध्ये द ओव्हल येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यात त्यांनी ५ विकेट्स घेतल्या, ज्यात दिग्गज फलंदाज विव्हियन रिचर्ड्सचाही समावेश होता. मात्र, १९९२ मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर एका कसोटी सामन्यादरम्यान त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर अकस्मात संपुष्टात आले.
हेही वाचा – IND vs ENG : SENA देशांत जसप्रीत बुमराहची जादू कायम, वसीम अक्रमला मागे टाकत रचला इतिहास
२०२३ मध्ये मोटर न्यूरॉन रोगाचे निदान –
Both teams are wearing black armbands to pay their respects to former England Cricketer, David ‘Syd’ Lawrence, who has sadly passed away.
There was a moment’s applause before start of play on Day 3. pic.twitter.com/SNvecJm9rh
— BCCI (@BCCI) June 22, 2025
२०२३ मध्ये लॉरेंस यांना मोटर न्यूरॉन रोगाचे निदान झाले होते. तरीही, त्यांनी या आजारापुढे हार मानली नाही आणि शेवटपर्यंत धैर्याने लढा दिला. ते ग्लॉस्टरशायर क्रिकेट क्लबचे अध्यक्षही होते आणि त्यांनी ही भूमिका अत्यंत सन्मान आणि समर्पणाने पार पाडली. त्यांच्या कुटुंबातील पत्नी गायनर आणि मुलगा बस्टर यांनी सर्व चाहते आणि शुभचिंतकांचे समर्थनाबद्दल आभार मानले असून या कठीण काळात काही वैयक्तिक शांततेची विनंती केली आहे.
ग्लॉस्टरशायर क्लबने अर्पण केली श्रद्धांजली –
ग्लॉस्टरशायर क्लबने त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, सिड प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे गेले आणि अखेरच्या क्षणापर्यंत इतरांना प्रोत्साहन देत राहिले. हे त्यांच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवते. डेव्हिड लॉरेन्स केवळ उत्कृष्ट क्रिकेटपटूच नव्हते, तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वही होते. त्यांच्या स्मृती आणि योगदान क्रिकेटप्रेमींच्या हृदयात कायम जिवंत राहतील.





