IND vs ENG : अंपायर धर्मसेनांचा वादग्रस्त इशारा? भारतीय चाहत्यांचा संताप, सोशल मीडियावर खळबळ, पाहा VIDEO

IND vs ENG Umpire Kumar Dharmasena faces backlash for allegedly aiding England : लंडनच्या ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या निर्णायक कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय संघाची सुरुवात अडखळत झाली असून, पहिल्या सत्रातच यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी विकेटेस गमावल्या आहेत. यानंतर सुदर्शन आणि गिल डाव सांभाळण्याचा प्रयत्न करत असताना एका घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. ज्यामुळे पंच कुमार धर्मसेना यांच्यावर टीका होत आहे.
नेमकं काय घडलं?
सामन्यादरम्यान एका घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. भारतीय डावाच्या १३व्या षटकात जोश टंगच्या इनस्विंगर चेंडूवर साई सुदर्शनच्या पायाला चेंडू लागला. इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार अपील केली, पण ऑन-फिल्ड अंपायर कुमार धर्मसेना यांनी सुदर्शनला नाबाद ठरवले. याचवेळी व्हायरल झालेल्या एका फोटो आणि व्हिडीओमुळे भारतीय चाहते संतापले आहेत. या व्हिडीओत कुमार धर्मसेना इंग्लंडच्या खेळाडूंना चेंडू पायऐवजी बॅटला लागल्याचे सांगताना दिसत असल्याचा दावा चाहत्यांनी केला आहे.
कुमार धर्मसेना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल –
Why is Sri Lankan umpire Kumar Dharmasena telling the English bowler that it’s a clear edge by showing his fingers?@ICC what’s going on ? Clearly he is fixing there because he showed that signal that’s why English fielders don’t appeal after that and don’t go for review… pic.twitter.com/hkqu6UFd2X
— MK (@mkr4411) July 31, 2025
Experts react as #KumarDharmasena makes a lightning-quick LBW call on #SaiSudharsan ⚡
Did he judge it too quickly or just perfectly? 👀#ENGvIND 👉 5th TEST, DAY 1 | LIVE NOW on JioHotstar 👉 https://t.co/04PYjgM7su pic.twitter.com/LJuKFV5Own
— Star Sports (@StarSportsIndia) July 31, 2025
ज्यामुळे इंग्लंडचा डीआरएस वाचला, असा आरोप चाहत्यांनी केला असून, धर्मसेनांनी अप्रत्यक्षपणे यजमान संघाला मदत केल्याचे म्हटले आहे. ज्यामुळे कुमार धर्मसेना यांना मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागत आहे. सध्या भारतीय चाहत्यांमध्ये अंपायरच्या निर्णयावरून नाराजी पसरली असून, सामन्याचा रोमांच शिगेला पोहोचला आहे. त्याचबरोबर कुमार धर्मसेना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : अंपायरने वाचवलं पण नशीब निघालं खराब…! यशस्वी जैस्वालच्या विकेटचा VIDEO व्हायरल
भारतीय फलंदाजीची निराशाजनक सुरुवात –
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला सुरुवातीला धक्के बसले. यशस्वी जैस्वाल अवघ्या ९ चेंडूत २ धावा करून बाद झाला, तर केएल राहुलने काही चांगले फटके खेळले, पण १४ धावांवर ख्रिस वोक्सच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला.





