IND vs ENG : कंधा टूटा-जज्बा नहीं! भारताने सामना जिंकला…पण वोक्सने एका हाताने फलंदाजी करत मनं जिंकली, पाहा VIDEO
IND vs ENG Chris Woakes’ Heroic Batting Steals Show : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने ओव्हलच्या मैदानावर ६ धावांनी रोमांचक विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडचा खेळाडू ख्रिस वोक्स याने दाखवलेल्या असामान्य साहसाने सर्वांचे लक्ष वेधले. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत २-२ ने बरोबरी साधली. या सामन्यातील ख्रिस वोक्सच्या साहसी फलंदाजी आणि भारतीय संघाच्या शानदार खेळाने क्रिकेटप्रेमींच्या मनात एक अविस्मरणीय ठसा उमटवला आहे.
वोक्सच्या साहसाला क्रिकेटप्रेमींचा सलाम –
सामन्याच्या अंतिम क्षणी इंग्लंडचे ९ गडी बाद झाले होते आणि विजयासाठी १७ धावांची गरज होती. यावेळी इंग्लंडकडे फक्त ख्रिस वोक्स हा शेवटचा खेळाडू शिल्लक होता. सामन्याच्या पहिल्याच दिवशी लॉन्ग ऑफ बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षण करताना वोक्सच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याचा खांदा निखळला होता.
वोक्स मैदानात उतरताच टाळ्यांचा कडकडाट –
Arm in a sling, Chris Woakes has arrived to the crease 😱 pic.twitter.com/D4QDscnfXE
— Sky Sports Cricket (@SkyCricket) August 4, 2025
त्यामुळे तो पहिल्या डावात फलंदाजीला उतरला नव्हता. परंतु, संघाला गरज पडल्यावर त्याने दुखापतीवर मात करत एका हाताने फलंदाजी करायला मैदानात प्रवेश केला. वोक्स मैदानात उतरताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याच्या साहसाचे स्वागत केले. भारतीय खेळाडू आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही त्याच्या या जिद्दी खेळाचे कौतुक केले. ज्याचा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – IND vs ENG : ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचा विजयोत्सव! सिराज-गंभीरच्या सेलिब्रेशनने वेधलं लक्ष, पाहा VIDEO
कशी झाली दुखापत?
सामन्याच्या पहिल्या दिवशी लॉन्ग ऑफ बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षण करताना वोक्सच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. यामुळे त्याला प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या आणि त्याने मैदान सोडले. यावेळी त्याचा खांदा विचित्रपणे वाकलेला दिसला. मालिकेबद्दल बोलायचे, तर या विजयासह भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राखली.
हेही वाचा – IND vs ENG : भारताचा ओव्हलवर ऐतिहासिक विजय; परदेशात प्रथमच पाचव्या कसोटीत केला ‘हा’ खास पराक्रम
मालिकेत पाहिला मिळाला जबरदस्त रोमांच –
मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे झाला, ज्यात इंग्लंडने २२ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर दुसरा सामना ३३६ धावांनी जिंकला. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने लॉर्ड्स येथे २२ धावांनी विजय मिळवत आघाडी घेतली. मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरला झाला, जिथे भारत पराभवाच्या उंबरठ्यावर होता. पण वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांच्या शानदार शतकांमुळे तो सामना अनिर्णित राहिला.





