IND vs ENG : ‘खेळायचे होते पण ते रिस्क नव्हती घ्यायची…’, बेन स्टोक्सने सांगितले अचानक माघार घेण्याचे कारण

IND vs ENG Ben Stokes Reaction : इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स खांद्याच्या दुखापतीमुळे भारताविरुद्ध ३१ जुलैपासून ओव्हल येथे सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार ऑली पोप संघाचे नेतृत्व करणार आहे. स्टोक्सने सांगितले की, हा सामना खेळणे धोकादायक ठरू शकले असते, कारण त्याची दुखापत आणखी गंभीर होण्याची शक्यता होती. वैद्यकीय सल्ल्यानंतर त्याने हा सामना खेळण्याचा निर्णय मागे घेतला.
या मालिकेत स्टोक्सने १७ विकेट्स घेतले आणि ३०४ धावा केल्या. मात्र, खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला विश्रांती घ्यावी लागत आहे. याशिवाय, चार वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या जोफ्रा आर्चरलाही या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. तसेच, ब्रायडन कार्सलाही विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणात गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन आणि जॉश टंग यांचा समावेश करण्यात आला आहे, तर जेकब बेथलने पण पाचव्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले आहे.
बेन स्टोक्स काय म्हणाला?
Huge update from the England camp! 🚨#BenStokes speaks about why he’s not part of the Playing 11! 🎙#ENGvIND 👉 5th TEST | Starts THU, 31st July, 2:30 PM | Streaming on JioHotstar! pic.twitter.com/0JU6GW2wmC
— Star Sports (@StarSportsIndia) July 30, 2025
बेन स्टोक्स म्हणाला, “मी निराश आहे. माझ्या खांद्याच्या स्नायूंमध्ये गंभीर दुखापत आहे. मी आज सकाळी फलंदाजी करून योगदान देण्याच्या विचारात होतो, पण वैद्यकीय पथकाशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला. जोखीम खूप होती. मी कोणालाही असा धोका पत्करायला सांगितला नसता. एक खेळाडू सामना जिंकवतो किंवा हरवतो असे नाही. मी खेळत असलो वा नसो, आमच्या संघात अनेक प्रतिभावन खेळाडू आहेत.”
हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलचा पिच वादावर मोठा खुलासा: क्युरेटरवर केले गंभीर आरोप, पाहा VIDEO
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) बुधवारी एका निवेदनात म्हटले की, “कर्णधार बेन स्टोक्स उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर आहे. याशिवाय, फिरकी गोलंदाज लियाम डॉसन, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्सही हा सामना खेळणार नाहीत.” या सामन्यात इंग्लंडचा संघ नव्या जोमाने मैदानात उतरेल आणि ऑली पोपच्या नेतृत्वाखाली भारताला कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा – WCL 2025 : भारत-पाक सेमीफायनल रद्द होणार? असं झाल्यास फायनलमध्ये कोणता संघ पोहोचणार?
पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: ऑली पोप (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग.





