IND vs ENG : बेन डकेटने रचला इतिहास! लीड्स कसोटीत ‘हा’ पराक्रम करणारा इंग्लंडचा ठरला पहिलाच खेळाडू

Ben Duckett Historic Century at Leeds Test : इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेटने लीड्स कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. यापूर्वी इंग्लंडच्या कोणत्याही फलंदाजाला जे जमले नव्हते, ते बेन डकेटने करून दाखवले. भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यातील दुसऱ्या डावात शतक झळकावून इंग्लंडला मजबूत स्थितीत पोहोचवले. बेन डकेटने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले होते, तर दुसऱ्या डावात त्याने शानदार शतक ठोकले.
बेन डकेटचा ऐतिहासिक शतक –
बेन डकेटने नेमका असा कोणता पराक्रम केला, जे यापूर्वी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त एकाच फलंदाजाला जमले आहे, आणि तो देखील इंग्लंडचा नव्हता. आजपर्यंत लीड्स येथे झालेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सलामीला येऊन शतक ठोकणारा एकमेव फलंदाज फक्त एकच होता, आणि तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आर्थर मॉरिस. आर्थर मॉरिसने १९४८ मध्ये इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटीच्या चौथ्या डावात सलामीला येत १८२ धावांची शानदार खेळी केली होती.
लीड्स कसोटीच्या चौथ्या डावात शतक ठोकणारा इंग्लंडचा पहिला सलामीवीर –
Ben Duckett departs after a brilliant 149 off 170 balls — a gritty knock that kept England in the hunt! 💯👏#ENGvsIND #EnglandCricket #BenDuckett #CricketTwitter pic.twitter.com/3C9lgrSMyN
— InsideSport (@InsideSportIND) June 24, 2025
त्यानंतर आजच्या सामन्यापर्यंत कोणताही फलंदाज हा स्कोअर तर सोडाच, पण शतकापर्यंतही पोहोचू शकला नव्हता. मात्र, आता बेन डकेटने हा दुष्काळ संपवला आहे. बेन डकेटने पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शानदार शतक ठोकले. पहिल्या डावात त्याने ९४ चेंडूंचा सामना करत ६२ धावा केल्या, ज्यात नऊ चौकारांचा समावेश होता. दुसऱ्या डावाबद्दल बोलायचे झाले, तर बेन डकेटने १२१ चेंडूंत शतक पूर्ण केले. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर चौकार मारत त्याने हा ऐतिहासिक टप्पा गाठला.
हेही वाचा – IND vs ENG : रवींद्र जडेजाने चेंडू बदलताच पंचांना चिडवलं; काय होतं कारण? VIDEO होतोय व्हायरल
बेन डकेटने भारताविरुद्ध दुसरे कसोटी शतक ठोकले –
या दुसऱ्या डावात त्याने १४ चौकार लगावले. दुसऱ्या बाजूने सलामीवीर झॅक क्रॉलीनेही त्याला पूर्ण साथ दिली. बेन डकेटने यासह आपले सहावे कसोटी शतक पूर्ण केले. भारताविरुद्ध त्याने नोंदवलेले हे दुसरे कसोटी शतक आहे. याशिवाय, त्याने पाकिस्तानविरुद्धही दोन कसोटी शतके झळकावली आहेत. तसेच, आयर्लंड आणि झिम्बाब्वेविरुद्धही त्याने कसोटी शतकं नोंदवली आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : झॅक क्रॉलीच्या ‘त्या’ कृतीने सिराज संतापला! मैदानावर तणावाचे वातावरण, VIDEO व्हायरल
बेन डकेटचे कसोटी कारकीर्द सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. जर त्याने असाच खेळ सुरू ठेवला, तर तो इंग्लंडसाठी बराच काळ कसोटी क्रिकेट खेळू शकतो. डकेट १७० चेंडूत २१ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १४९ धावा काढल्यानंतर बाद झाला. डकेट शानदार फलंदाजी करत होता, पण शार्दुलने त्याला आपला बाद केले.





