IND vs ENG : कर्करोगाशी लढताना भावाचा आधार; ज्योतीने सांगितली आकाशच्या विजयाची भावनिक गोष्ट

IND vs ENG Akash Deep Sister Reaction : इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन कसोटीत आपल्या भेदक गोलंदाजीने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा आकाश दीप चर्चेत आहेत. सामन्यात १० विकेट्स घेत इंग्लंडमध्ये कोणत्याही भारतीय गोलंदाजाने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम नोंदवणाऱ्या आकाशने आपला सामनाविजयी प्रदर्शन आपल्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या बहिणीला समर्पित केले. यावर त्याची बहीण ज्योतीने सांगितले की, आकाश असे काही बोलेल याची तिला कल्पनाच नव्हती.
इंडिया टुडेशी बोलताना तिने सांगितले की, तिच्या भावाने कठीण काळात संपूर्ण कुटुंबाला आनंद दिला आहे. आकाश दीपची बहीण ज्योती गेल्या दोन महिन्यांपासून कर्करोगाने ग्रस्त आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. कुटुंबाने ही बाब सार्वजनिक केली नव्हती, परंतु भावनाविवश आकाशने ही गोष्ट केवळ आंतरराष्ट्रीय टीव्हीवर उघड केलीच नाही, तर आपल्या बहिणीला धीरही दिला की, “आम्ही तुझ्यासोबत आहोत.” ज्योतीने सांगितले की, तिला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग आहे आणि तिच्या उपचारांना आणखी सहा महिने लागतील.
आकाश दीपची बहिण काय म्हणाली?
VIDEO | Indian pace bowler Akash Deep dedicated his success in Edgbaston Test to his cancer-stricken sister Akhand Jyoti. She shares her feelings:
“Akash has dedicated his biggest achievement to me, I am feeling very proud. He has made the country proud. He was youngest among… pic.twitter.com/CQVlddKd9h
— Press Trust of India (@PTI_News) July 7, 2025
ज्योती म्हणाली, “हा भारतासाठी अभिमानाचा विषय आहे. त्याने १० विकेट्स घेतल्या. इंग्लंड दौऱ्यापूर्वी आम्ही त्याला विमानतळावर भेटायला गेलो होतो. मी त्याला सांगितले, ‘मी पूर्णपणे ठीक आहे. माझी काळजी करू नको, फक्त देशासाठी चांगली कामगिरी कर.’ मला तिसऱ्या टप्प्याचा कर्करोग आहे आणि डॉक्टरांनी सांगितले आहे की, उपचारांना आणखी सहा महिने लागतील, त्यानंतर पुढे पाहू.”
हेही वाचा – DPL 2025 Auction : दिग्वेश राठीचं चमकलं नशीब! DPL मध्ये लागली IPL पेक्षा जास्त बोली!
मला अजिबात कल्पना नव्हती – ज्योती
ज्योतीने पुढे सांगितले, “मला अजिबात कल्पना नव्हती की आकाश असे काही बोलेल. कदाचित आम्ही याबाबत सार्वजनिकपणे बोलण्यासाठी तयार नव्हतो, पण ज्या पद्धतीने तो माझ्यासाठी भावनिक झाला आणि त्याने आपले प्रदर्शन मला समर्पित केले, ही खूप मोठी गोष्ट आहे. यातून दिसते की, तो माझ्यावर आणि आमच्या कुटुंबावर किती प्रेम करतो. घरी ज्या प्रकारची परिस्थिती आहे, त्यातही त्याने अशी कामगिरी करून विकेट्स घेणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. तो ज्यांच्याशी सर्वात जवळचा आहे, त्यापैकी मी एक आहे.”





