IND vs ENG 3rd Test Day 2 (Rajkot Test) : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज सामन्याचा दुसरा दिवस असून भारतीय संघाचा पहिला डाव 445 धावांवर संपला आहे.
तत्पूर्वी, भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी 5 बाद 326 धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे पहिल्या दिवसाचे नाबाद फलंदाज लवकरच पॅव्हेलियनकडे वळले. मात्र यानंतर खालच्या फळीतील फलंदाजांनी उपयुक्त योगदान दिले. ध्रुव जुरेल व्यतिरिक्त रवी अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी छोट्या पण महत्त्वाच्या खेळी खेळल्या.
Innings Break!
A solid batting performance from #TeamIndia to post 4⃣4⃣5⃣ on the board! 💪 💪
Scorecard ▶️ https://t.co/FM0hVG5pje#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/jNltRFg5FN
— BCCI (@BCCI) February 16, 2024
331 धावांच्या स्कोअरवर भारतीय संघाला सहावा धक्का बसला. कुलदीप यादव 4 धावा करून जिमी अँडरसनचा बळी ठरला. त्यानंतर लगेचच रवींद्र जडेजा बाद झाला. रवींद्र जडेजाला जो रूटने बाद केले. भारतीय अष्टपैलू खेळाडूने 225 चेंडूत 112 धावांची खेळी खेळली. यानंतर ध्रुव जुरेल आणि रवी अश्विन यांच्यात चांगली भागीदारी झाली. ध्रुव जुरेल 104 चेंडूत 46 धावा करून रेहान अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. रवी अश्विन 37 धावा करून रेहान अहमदचा बळी ठरला. जसप्रीत बुमराहने 26 धावांचे उपयुक्त योगदान दिले.
पहिल्या दिवशी रोहित शर्मानंतर सरफराज चमकला
याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक झळकावले होते. भारतीय कर्णधाराने 196 चेंडूत 131 धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचवेळी सरफराज खानने पदार्पणाच्या कसोटीत 62 धावांची झंझावती खेळी केली.
IND vs ENG 3rd Test : रोहित शर्मानं इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून रचली विक्रमांची मालिका….
इंग्लिश गोलंदाजांची कामगिरी..
इंग्लंडच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर मार्क वुड हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मार्क वुडने टीम इंडियाच्या 4 फलंदाजांना आपले बळी बनवले. रेहान अहमदला 2 यश मिळाले. जिमी अँडरसन, टॉम हार्टले आणि जो रूट यांना प्रत्येकी 1-1 यश मिळाले.