IND vs ENG 3rd Test | तिसऱ्या कसोटीसाठी कोणाला मिळणार डच्चू, अक्सर की कुलदीप…?

India vs England 3rd Test in Rajkot :- भारत व इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका आता १-१ अशी बरोबरीत आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंड आणि दुसरा सामना भारताने जिंकला होता. आता आजपासून तिसऱ्या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी अंतिम संघात कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. त्यासाठी कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमोर मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. रवींद्र जडेजा संघात परतणार असल्याने अक्सर पटेल व कुलदीप यादव ( Kuldeep Yadav or Axar Patel ) यांच्यापैकी कोणाला वगळायचे यावर बरीच काथ्याकुट करावी लागणार आहे.
तिसरा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या संघात अनेक बदल होणार आहेत. रवींद्र जडेजा आता फिट झाला असून तो खेळणार असल्याचे निश्चत असल्याने कुलदीप किंवा पटेल यांच्यापैकी एकाला बाहेर बसावं लागणार आहेत. त्यातही कुलदीपचा पत्ता कट होण्याची जास्त शक्यता आहे.
दोन्ही कसोटींमध्ये पटेल याला खेळण्याची संधी मिळाली होती. दोन्ही सामन्यात मिळून त्याने ५ बळीहीघेतले आहेत. तर फलंदाज म्हणून १३३ धावा केल्या आहेत. तर कुलदीपला फक्त एक सामन्यातच संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने ४ बळी घेतले तर केवळ ८ धावांचे योगदान दिले होते.
तिसऱ्या कसोटीसाठी भारताचा संभाव्य संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्सर पटेल, वॉशिंग्टन सुंदर , कुलदीप यादव , महंमद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, देवदत्त पडिक्कल.





