India vs England 3rd Test, Rajkot | भारताविरुद्धच्या राजकोट कसोटीसाठी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हन घोषित केले आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. शोएब बशीरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून खेळवला जाणार आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होणार आहे. टीम इंडियाने अद्याप प्लेइंग इलेव्हन घोषित केलेले नाही.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ( England Cricket Board ) आपल्या अधिकृत वेबसाइटवर प्लेइंग इलेव्हनची माहिती शेअर केली आहे. भारताविरुद्धच्या राजकोट कसोटीसाठी मार्क वुडला संधी देण्यात आल्याचे बोर्डाने बुधवारी सांगितले. प्लेइंग इलेव्हनमध्ये वुडचा समावेश आहे. वुडच्या पुनरागमनामुळे शोएब बशीरला वगळण्यात आले आहे. बशीर यांची हकालपट्टी का करण्यात आली याबाबत बोर्डाने कोणतीही माहिती दिलेली नाही. कर्णधार बेन स्टोक्स राजकोटमध्ये कसोटी ( Rajkot Test ) कारकिर्दीतील 100 वा सामना खेळणार असल्याची माहितीही बोर्डाने दिली.
England announce their playing XI for the Rajkot Test 👀
— ICC (@ICC) February 14, 2024
कशी आहे मार्क वुडची कामगिरी…?
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडची आतापर्यंतची कारकीर्द चमकदार आहे. त्याने 32 कसोटी सामन्यात 104 बळी घेतले आहेत. या काळात त्याने 4 वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. वुडने कसोटी फॉरमॅटमध्येही अर्धशतक झळकावले आहे. त्याने 735 धावा केल्या आहेत. वुडने 66 एकदिवसीय सामन्यांमध्ये 77 विकेट घेतल्या आहेत. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. मार्क वुड टीम इंडियाविरुद्ध हैदराबाद कसोटीत खेळला होता. मात्र या सामन्यात त्याला विकेट घेता आली नाही. यानंतर त्याला विशाखापट्टणम कसोटीसाठी संधी देण्यात आली नाही. आता तो प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे.
BCCI | इशान-श्रेयसला मोठा झटका! बीसीसीआयनं फर्मान देत संघनिवडीबाबत घेतला ‘हा’ कठोर निर्णय…
इंग्लंडने शोएब बशीरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आहे. याशिवाय कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. बेन डकेट जॅक क्रॉलीसह संघासाठी सलामी देऊ शकतो. ऑली पोप तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. जो रूट क्रमांक 4 वर फलंदाजीला येऊ शकतो. जॉनी बेअरस्टो आणि बेन फॉक्स हे देखील प्लेइंग इलेव्हनचा भाग आहेत.
इंग्लंडची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे –
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (उपकर्णधार), जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स (विकेटकीपर),रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन.